लोकप्रिस मोबाइल मेसेंजर सेवा व्हॉट्स अॅपचे देशात सात कोटींहून अधिक वापरकर्ते असून भारत ही आमच्यासाठी मोठी बाजारपेठ असल्याचे व्हॉट्स अॅपचे व्यापार विभागाचे उपाध्यक्ष नीरज अरोरा यांनी येथे सांगितले. येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘इंक’ च्या पाचव्या परिषदेत ते बोलत होते.
जगातील काही देशांमध्ये व्हॉट्सअॅपचे वापरकर्ते मोठय़ाप्रमाणावर असून त्यातील एक भारत आहे. भारत्यासारख्या मोठय़ा बाजारपेठेत अधिकाधिक सुविधा देणे हे आमचे लक्ष्य असेल असेही अरोर यांनी स्पष्ट केले. अरोरा हे मूळचे भारतीय असून ते आयआयटी, दिल्लीचे माजी विद्यार्थी आहेत. व्हॉट्सअॅपमध्ये रूजू होण्यापूर्वी त्यांनी गुगलमध्ये काम करत होते. व्हॉट्सअॅप ही कंपनी फेसबुक या सोशल मीडिया कंपनीने विकत घेतली असली तरी आमच्या कंपनीचे वेगळे अस्तित्त्व असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आमच्या कंपनीत केवळ ८० कर्मचारी असून त्यांना या मोठय़ा कंपनीत खूप काही शिकायला मिळत असल्याचेही ते म्हणाले. गेल्या तीन वर्षांमध्ये व्हॉट्सअॅपच्या वापरकर्त्यांमध्ये दुप्पट वाढ झाली असून जगभरात या अॅपचे एकूण ६० कोटी वापरकर्ते आहेत. व्यवसायातील कोटय़वधींच्या आकडेवारी पेक्षा कोटय़वधी लोकांना उपयुक्त असेल आणि वापरता येईल असे उत्पादन तयार करणे हा कंपनीच्या संस्थापकांचा उद्देश होता. तोच उद्देश यापुढेही कायम राहील असा
संग्रहित लेख, दिनांक 3rd Nov 2014 रोजी प्रकाशित
भारतात व्हॉट्सअॅपचे सात कोटींहून अधिक वापरकर्ते
लोकप्रिस मोबाइल मेसेंजर सेवा व्हॉट्स अॅपचे देशात सात कोटींहून अधिक वापरकर्ते असून भारत ही आमच्यासाठी मोठी बाजारपेठ असल्याचे व्हॉट्स अॅपचे व्यापार विभागाचे उपाध्यक्ष नीरज अरोरा यांनी येथे सांगितले. येथे आयोजित करण्यात आलेल्या 'इंक' च्या पाचव्या परिषदेत ते बोलत होते.
First published on: 03-11-2014 at 03:52 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp user base crosses 70 million in india