भाजपाविरोधात देशातील अनेक राजकीय पक्ष एकत्र आले असून त्यांनी इंडिया आघाडीअतंर्गत मोट बांधली आहे. या इंडिया आघाडीची बैठक उद्या (३१ ऑगस्ट) मुंबईतील ग्रॅण्ड हयात येथे होत आहे. या बैठकीसाठी देशभरातील नेते मुंबईत होणार असून आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती या माध्यमातून ठरवण्यात येणार आहे. दरम्यान, जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरस पक्षाचे माजी अध्यक्ष फारुक अब्दुल्ला मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत येताच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

“देशभरातील अनेक नेते येथे येणार आहेत. हा देश वाचण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. हा देश आपल्या सर्वांचा आहे. एकता आणि अनेकता महत्त्वाची. अनेकता मजबूत असेल तर एकता मजबूत होईल. भारताच्या समस्या दूर करण्याकरता आपल्याला सर्वांना अनेकताला मजबूत करायचं आहे”, असं फारुक अब्दुल्ला म्हणाले.

Ranveer Singh Angry Criticizes Narendra Modi Calls PM
“नरेंद्र मोदी सर्व नकारात्मक गोष्टी साजऱ्या करतात, त्यांनी..”, रणवीर सिंहची मोदींवर सडकून टीका? Video ची गोष्ट वेगळीच
Amir Khan Video Supporting Congress Asking for 15 lakhs
“जर कुणाच्या खात्यात १५ लाख नसतील तर..”, म्हणत आमिर खान काँग्रेसच्या प्रचाराला उतरला? Video पाहिलात का?
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”
sharmila tagore property
“मी खरेदी केलेली संपत्ती माझ्याच नावावर”, शर्मिला टागोर यांची माहिती; म्हणाल्या, “इस्लाममध्ये मृत्यूपत्र करण्याची…”

देवाने फोन केलेला नाही

यावेळी फारुक अब्दुल्ला यांना किती जागा जिंकू शकाल असा प्रश्न विचारण्यात आला. कारण, भाजपाने ३०० पेक्षा अधिक जागा जिंकणार असल्याचा दावा केला आहे. त्यावर फारुक अब्दुल्ला म्हणाले की, “भाजपाकडून नेहमीच असे दावे केले जातात. त्यांना देवाकडून संदेश प्राप्त झाला असेल की ते एवढ्या जागा जिंकणार आहेत. आम्हाला अद्यापही देवाचा फोन आलेला नाही, देवाचा फोन आला की आम्ही कळवू”, असंही मिश्कीलपणे फारुक अब्दुल्ला म्हणाले.

“जर माझ्याकडे जीन असता तर मी त्याला विचारलं असतं की किती जागा जिंकू? असं कोणतं मशीन माझ्याकडे असतं तर मी मशिनला विचारलं असतं की आम्ही किती जागा जिंकू, आम्ही जिंकू की नाही?”, असंही अब्दुल्ला म्हणाले.

राम मंदिर उद्घाटनावेळी दगडफेक होईल का?

राम मंदिराचे लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे. यावेळी दगडफेक केली जाईल, असा दावा केला जातोय. यावर फारुक अब्दुल्ला म्हणाले की, या जगात काहीही होऊ शकतं. पण आरामात निवडणुका व्हायला हव्यात.