मुंबई : अदानी उद्योग समूहात २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक कोणाची आहे, या गुंतवणुकीत चीनच्या एका नागरिकाचा समावेश आहे, तो चिनी नागरिक कोण, याची माहिती देशातील जनतेला मिळाली पाहिजे, त्यासाठी या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशी होणे आवश्यक आहे, अशी मागणी काँग्रेस समितीचे प्रवक्ते पवन खेरा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

अदानी उद्योग समूहात २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक कुणाची आहे, हाच मुद्दा राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. अदानी घोटाळय़ाची चौकशी करायची असेल तर जेपीसी स्थापन करून चौकशी करावी, अशी काँग्रेसची मागणी आहे, परंतु मोदी सरकार त्यास तयार नाही, अशी टीका त्यांनी केली. राहुल गांधी यांनी ७ फेब्रुवारीला संसदेत अदानी-मोदी संबंधांचा मुद्दा उपस्थित केला आणि ९ दिवसांनंतर लगेच सुरत न्यायालयातील जुने प्रकरण कारवाईसाठी उघडले गेले असा आरोप खेरा यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सावरकर मुद्दय़ाचा परिणाम नाही

ठाकरे गट व काँग्रेस यांच्यात सावरकरांच्या मुद्दय़ावरून वाद निर्माण झाला असला तरी, महाविकास आघाडीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही, आघाडी मजबूत आहे, असे खेरा म्हणाले. प्रत्येक पक्षाचे आपले-आपले विचार असतात, प्रत्येकाला विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे.