Wife Circulates Intimate Video of her Husband : विवाहबाह्य संबंधातून शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर हे फोटो आणि व्हिडीओ सार्वजनिक करण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका जोडप्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यवर्ती मुंबईतील एका उच्चभ्रू इमारतीत ही महिला तिच्या पती आणि मुलीबरोबर राहते. पोलिसांना दिलेल्या जबाबात तिने म्हटलंय की २०१७ मध्ये ५४ वर्षीय व्यक्ती त्याच्या पत्नी आणि दोन मुलांसह एकाच मजल्यावर राहण्याची आला होता. २०१९ च्या सुमारास दोघांमध्ये चांगली मैत्री आणि मैत्रीचं रुपांतर नात्यात झालं.

हेही वाचा >> मुलाचं विमानाचं तिकिट काढलं, नातेवाईकाला बँकेची माहिती दिली; पत्नीची हत्या करून पती…; गोरेगावात खळबळ!

घरी कोणी नसताना त्यांच्या घरी भेटायचो

“आम्ही दोघं फोनवर बोलू लागलो. एक दिवस त्याची बायको आणि मुलं घरी नसताना त्याने मला त्याच्या घरी बोलावलं. तेव्हापासून त्यांच्या घरी कोणी नसताना आम्ही त्यांच्या घरी भेटायचो”, असं तक्रारदार महिलेने पोलिसांना सांगितलं. मात्र १५ जुलै रोजी तक्रारदार महिलेला त्याच्या पत्नीचा फोन आणि त्यांच्या नात्याबाबत विचारपूस सुरू केली. यानंतर त्याची पत्नी तिच्या घरी गेली आणि त्यांचे खासगी फोटो आणि व्हिडिओ या महिलेला दाखवून धमकावले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माझी बदनामी केली गेली

तक्रारदार महिलेचा दावा आहे की आरोपीने गुपचूप त्यांचे फोटो काढले आहेत. हे फोटो कोणालाही शेअर करू नयेत अशी विनंतीही तक्रारदार महिलेने केली. परंतु, तरीही हे खासगी फोटो आणि व्हिडिओ त्याच्या पत्नीने तक्रारदार महिलेच्या नातेवाईकांना पाठवले. याबाबत तक्रारीत म्हटलंय की, तिने माझी बदनामी केली. त्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबीयांना खूप मानसिक आघात झाला. परंतु, त्यानंतरही मी पोलिसांत तक्रार दाखल केली नव्हती. मात्र मंगळवारी ते फोटो आणि व्हिडिओ पॉर्न साईट्सवर पोस्ट करण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे ही महिला घाबरली. परिणामी तिने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली.