मुंबई : दक्षिण मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथीगृहासमोर मंगळवारी भीषण अपघात झाला असून त्यात बेस्टच्या इलेक्ट्रीक बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या मोटारगाडीला धडक दिली. त्यावेळी बस व मोटरगाडीमध्ये चिरडून महिलेचा जागीच मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. महिला स्थानिक रहिवासी असून मॉर्निग वॉकसाठी तेथे आली होती.

बेस्टच्या इलेक्ट्रिक बसच्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. १०५ क्रमांकाच्या इलेक्ट्रिक बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या मोटारगाडीला धडक दिली. बस आणि मोटारगाडीमध्ये चिरडून एका पादचारी महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही महिला मॉर्निंग वॉकला निघाली होती. त्यादरम्यान हा अपघात झाला. महिलेला तातडीने जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली. पोलिसांनी अपघातानंतर तात्काळ स्वतःच्या मोबाइल व्हॅनमधून महिलेला रुग्णालयात नेले. महिलेचे नाव निता शहा असून त्या रिज रोडवरील प्रकाश बिल्डिंग येथील रहिवाशी असल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.