लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : स्त्रियांच्या आरोग्याविषयीची अनेक पुस्तके आहेत, परंतु “स्त्रियांचे आरोग्य” हे पुस्तक नेमकी माहिती देते. याचे वैशिष्ट्य म्हणजे ते स्त्रियांच्या पर्समध्ये राहील अशा आकाराचे आहे. त्यामुळे ते हवे तेव्हा वाचता येईल. हे पुस्तक फार महत्त्वाचे असून, सोप्या भाषेत लिहिलेले आहे, असे गौरवोद्गार विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काढले.

ग्रंथालीने प्रसिद्ध केलेल्या डॉ. राजश्री कटके लिखित “स्त्रियांचे आरोग्य” या पुस्तकाचे प्रकाशन १२ जून रोजी, मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी विधान परिषदेच्या आमदार भारती लव्हेकर, डॉ. तात्याराव लहाने, पद्मा धामणे राव, पत्रकार राही भिडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, सुदेश हिंगलासपूरकर, डॉ. कटके यांच्या मातोश्री आणि सासरे मंचावर उपस्थित होते.

आणखी वाचा-नीट परीक्षेतील गैरप्रकार प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, पुनर्परीक्षा घेण्याची इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समाजमाध्यमांवर विविध प्रकारच्या उपचारांबाबतच्या चित्रफिती प्रसारित होत असतात. त्यासाठी तपासणी करण्याबाबत सुचवले जाते. मात्र त्यात किती तथ्य असते याचा विचार करायला हवा, असे डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या.यावेळी लेखिका डॉ. राजश्री कटके यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर यांनी प्रास्ताविक केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज दळवी यांनी केले.