scorecardresearch

मुंबई : इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून पडून कर्मचाऱ्याचा मृत्यू

१२ व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी चेंबूर परिसरात घडली.

मुंबई : इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून पडून कर्मचाऱ्याचा मृत्यू
बाह्यवळण मार्गावर अपघातात संगणक अभियंता युवतीचा मृत्यू (प्रातिनिधिक फोटो-लोकसत्ता)

डागडुजीचे काम सुरू असताना इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी चेंबूर परिसरात घडली. याबाबत चेंबूर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. चेंबूरच्या सिंधी सोसायटी परिसरातील ‘हरिकुंज’ या इमारतीमध्ये काही महिन्यांपासून डागडुजीचे काम सुरू आहे.

हेही वाचा >>> मुंबई : नवाब मलिक यांच्या मुलाविरोधात कुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी कर्मचारी इमारतीत काम करीत होते. त्याच वेळी अचानक हुसेन शेख (२५) हा कर्मचारी १२ व्या मजल्यावरून खाली कोसळला. या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. चेंबूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-01-2023 at 19:30 IST

संबंधित बातम्या