समीर वानखेडेंना आता झेड प्लस सुरक्षा; गृहमंत्रालयाचा निर्णय

समीर वानखेडे यांची सुरक्षा आता झेड प्लस दर्जाची करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

samee wankhede
समीर वानखेडे (संग्रहीत छायाचित्र)

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या सुरक्षेमध्ये आता वाढ करण्याचा निर्णय गृहमंत्रालयाने घेतला आहे. समीर वानखेडेंना आता झेड प्लस सुरक्षा देण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून समीर वानखेडे यांच्यावर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सातत्याने पत्रकार परिषदा घेऊन नवनवे आरोप केले आहेत. त्यांनी २ ऑक्टोबरला मुंबईत कॉर्टेलिया क्रूजवर केलेल्या कारवाईवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

समीर वानखेडे यांच्या लग्नाबाबत, त्यांच्या धर्माबाबत सध्या मोठा वाद सुरू आहे. समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाच्या मुद्द्यावरून देखील आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यांचं पहिलं लग्न एका मुस्लीम महिलेशी झालेलं होतं. मात्र, त्यावेळी समीर वानखेडे हे देखील मुस्लीमच होते, असा दावा त्यांचं लग्न लावणाऱ्या काझींनी केला आहे. समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मात्र आपण हिंदूच असल्याचं सांगितलं आहे. या मुद्द्यावरून अनेक शंका उपस्थित केल्या जात असून वाद निर्माण झाला आहे.

नवाब मलिकांच्या पत्रावर कारवाई नाही

दरम्यान, नवाब मलिक यांनी एनसीबीकडे पाठवलेल्या पत्रावर विभागाकडून कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. नवाब मलिक यांच्याकडे आलेल्या एका निनावी पत्रामध्ये समीर वानखेडे यांच्यावर आरोप करण्यात आले होते. हे पत्र नवाब मलिक यांनी एनसीबीकडे पाठवून त्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, “महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीच्या संचालकांना पाठवलेल्या निवावी पत्रावर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही”, असं एनसीबीनं स्पष्ट केलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Z plus security for sameer wankhede ncb divisional director aryan khan case pmw

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख
ताज्या बातम्या