विजेच्या धक्क्याने वर्षांकाठी हजारावर मृत्यू
महाराष्ट्रात वर्षांकाठी विजेचा धक्का लागून १ हजारांहून अधिक मृत्यू होत आहे. त्यातील ७०च्या जवळपास घटना एकटय़ा नागपुरात होतात. अशा घटनांमध्ये महावितरण वा वीज वितरण करणाऱ्या फ्रेंचाईझीची चूक असल्यास पूर्वी वीज कंपनीकडून मरण पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना केवळ २ लाख रुपये भरपाई देऊन त्यांची बोळवण केली जात होती. महावितरणने ही मदत दुपटीने वाढवून आता ४ लाख रुपये केली आहे. त्यामुळे मरण पावलेल्या वक्तीच्या कुटुंबीयांना जगण्याकरिता थोडा आधार मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
मुंबईचा काही भाग वगळता संपूर्ण राज्यभरात महावितरणच्यावतीने २ कोटी ३० लाखांहून अधिक वीज ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. त्यात १ कोटी ७० लाखांच्या आसपास घरगुती, १७ लाखांच्या आसपास व्यावसायिक, ४ लाखांच्या आसपास औद्योगिक व उर्वरित इतर वेगवेगळ्या संवर्गातील लक्षावधी ग्राहकांचा समावेश आहे. महावितरणने नागपूरच्या तीन विभागात ‘एसएनडीएल’, भिवंडी येथे टोरांट या खासगी फ्रेंचाईझीकडे वीज वितरणाची जवाबदारी काही वर्षांपूर्वी सोपवली होती. त्याकरिता करण्यात आलेल्या करारानुसार या खासगी फ्रेंचाईझीलाही महावितरणने त्यांच्या ग्राहकांकरिता घेतलेल्या सर्व निर्णयांचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यानुसार पूर्वी महावितरण वा फ्रेंचाईझीच्या हद्दीत वीज वितरण कंपनीच्या चुकीमुळे कुणाचा मृत्यू झाल्यास त्याला केवळ २ लाखांची भरपाई दिली जात होती. ही रक्कम फार कमी असल्याने घरातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर या कुटुंबीयांवर आर्थिक संकट उभे राहात होते. तेव्हा गेल्या अनेक वर्षांपासून ही मदतीची रक्कम वाढवण्याची मागणी महावितरणसह शासनाकडे केली जात होती. शेवटी महावितरणने स्वत:च्या चुकीने मृत्यू होणाऱ्या कुटुंबीयांना आधार मिळावा म्हणून ही मदत दुपटीने वाढवून ती ४ लाख रुपये केली आहे.
महाराष्ट्रात सन २०१५-१६ मध्ये नागपूर जिल्ह्य़ात ६९ मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. ही संख्या २०१६-१७ च्या एप्रिल या एकच महिन्यात सहाच्या जवळपास आहे. यापैकी ८० ते ९० टक्के मृत्यू हे वीज ग्राहकांच्या चुकीमुळे त्यांच्या घर वा वेगवेगळ्या ठिकाणी झाले आहे. परंतु उर्वरित १० ते २० टक्के मृत्यू हे वीज उपकेंद्रासह खांब, वीज तारांसह इतर वेगवेगळ्या पद्धतीने वीज कंपनीच्या चुकीनेही झाल्याचे निदर्शनात आले आहे म्हणूनच कंपनीच्या चुकीमुळे व्यक्ती मरण पावल्यास त्याच्या कुटुंबीयांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

कर्मचाऱ्यांना लाभ नाही
महावितरणने मृत्यू होणाऱ्या सामान्य नागरिकांना ४ लाख रुपये आर्थिक मदतीचा निर्णय घेतला असला तरी त्यातून वीज कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांना कंपनीच्या वतीने वैद्यकीय प्रतिपूर्तीसह इतर बरेच लाभ कायद्याने दिले जात असल्याने त्यांना वगळल्याचे महावितरणने म्हटले आहे.

tankers, Tanker inspection drive,
टॅंकरच्या बेदरकारपणाला आवर, अपघात दुर्घटनेनंतर वाहतूक विभागाकडून टॅंकर तपासणी मोहीम
Gajlaxmi Rajyog
येत्या ७ दिवसांनी ‘या’ राशींचे येणार चांगले दिवस? ‘शुभ योग’ बनल्याने लक्ष्मी कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ
vasai crime news, wife s murder accused marathi news
वसई: पत्नीच्या हत्येचा आरोपी पॅरोलवरून फरार, वालीव पोलिसांनी ५ वर्षानंतर केली अटक
ससूनमध्ये नेमकं काय घडलं? उंदीर चावल्याने रुग्णाचा मृत्यू नव्हे तर दुसरेच कारण