२४ तासांत २९ मृत्यू; ६०९ नवीन रुग्णांची भर

नागपूर : जिल्ह्य़ात २४ तासांत २९ करोनाबाधितांचा मृत्यू झाला व ६०९ नवीन बाधितांची भर पडली. याशिवाय दिवसभरात ७४३ जण करोनामुक्त झाल्याने गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला नवीन बाधितांच्या तुलनेत करोनामुक्त अधिक असण्याचा क्रम आजही कायम राहिला.

नवीन बाधितांमध्ये शहरातील ४०३, ग्रामीणचे १९७, जिल्ह्य़ाबाहेरील ९ अशा एकूण ६०९ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे आजपर्यंत शहरातील बाधितांची संख्या ६९ हजार ३८७, ग्रामीण १८ हजार ६०४, जिल्ह्य़ाबाहेरील ५०८ अशी एकूण ८८ हजार ४९९ वर पोहचली आहे.

दिवसभरात शहरात ११,  ग्रामीण  ९, जिल्ह्य़ाबाहेरील ९ असे एकूण २९ मृत्यू झाले. त्यामुळे आजपर्यंत शहरातील बळींची संख्या २ हजार ३०, ग्रामीण ५१३, जिल्ह्य़ाबाहेरील २ हजार ८६९ वर पोहचली आहे. गेल्या १२ ते पंधरा दिवसांतील एखाद दिवस सोडला तर जिल्ह्य़ात नवीन बाधितांच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक  आहे. बुधवारीही शहरातील ४७७, ग्रामीणचे २६६ असे एकूण ७४३ करोनामुक्त झाले.

या संख्येमुळे आजपर्यंत शहरातील करोनामुक्त झालेल्यांची संख्या ६२ हजार १६८, ग्रामीण १६ हजार ४६ असे एकूण ७८ हजार २१४ वर पोहचली आहे. जिल्ह्य़ात करोनामुक्तांचे प्रमाण  ८८.३८ टक्के आहे, हे विशेष.

गृह विलगीकरणात ४,७८२ बाधित

शहरात ४ हजार ९१८, ग्रामीणला २ हजार ४९८ असे एकूण ७ हजार ४१६ सक्रिय करोनाबाधित आहेत. त्यातील २ हजार २५ बाधितांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. ४ हजार ७८२ जण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

ग्रामीणमध्ये दिवसभरात केवळ १७ टक्के चाचण्या

जिल्ह्य़ात दिवसभरात ५ हजार ४२८ चाचण्या करण्यात आल्या. यापैकी ४ हजार ५०१ चाचण्या शहर तर ९२७ चाचण्या ग्रामीण भागातील  होत्या. शहरी भागात ८३ टक्के तर ग्रामीणला केवळ १७ टक्केच चाचण्या झाल्या. मुळात चाचण्यांसाठी येणारे  कमी झाल्याने ही संख्या कमी असल्याचा प्रशासनाचा दावा आहे.

विदर्भातील मृत्यू

(१४ ऑक्टोबर)

जिल्हा                  मृत्यू

नागपूर                   २९

वर्धा                       ०१

चंद्रपूर                   ०३

गडचिरोली             ००

यवतमाळ               ०१

अमरावती              ०४

अकोला                  ००

बुलढाणा               ००

वाशीम                  ००

गोंदिया                  ००

भंडारा                    ०४

एकूण                   ४२