पक्षी, प्राण्यांसाठी सुंदर अधिवास

पक्ष्यांचे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवेगाव राष्ट्रीय उद्यानातील पक्षीवैभव गेल्या काही वर्षांत लयाला गेले होते. वनमहर्षी मारुती चितमपल्ली यांच्या कार्यकाळात नवेगाव तलावाने ‘सारसनाची’च्या कित्येक आठवणी साठवल्या होत्या. कालांतराने त्याकडेही दुर्लक्ष झाले आणि सारसनाचीच नाही तर येथील पक्षीवैभव देखील लयाला गेले. मात्र, त्याला संजीवनी देण्यासाठी नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्प व्यवस्थापनाने कंबर कसली असून ‘बर्ड हॅबिटॅट रिस्टोरेशन’ कार्यक्रमाअंतर्गत मार्च २०१८ पासून पक्ष्यांचा अधिवास पुनरुज्जीवित केला जात आहे.

Jitendra Awhad
“ठाण्यात ‘वरून’ हा शब्द सुरू झालाय, तो कुठून येतो? हे…”, जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट चर्चेत
three thousand families staying near waldhuni river boycotting lok sabha election, construction within river bed
कल्याणमध्ये वालधुनी नदी परिसरातील तीन हजार कुटुंबीयांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
श्श्श्श… वाघोंबांची तलावामध्ये सुरू आहे पूल पार्टी; ‘ठंडा ठंडा कुल कुल’मुळे बाहेर निघायलाच तयार नाही
narayan rane
शिंदे गट भाजपवर नाराज! राणे यांच्या विधानांमुळे दुखावल्याची भावना, जागावाटपाचा तिढा कायम

नवेगावबांधची खरी ओळख पक्ष्यांसाठी आहे. काही वर्षांपूर्वी नवेगाव तलावावर सारस पक्ष्यांची मक्तेदारी होती. आता मात्र सारसच नाही तर स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांनीदेखील तलावाकडे पाठ फिरवली आहे. एवढेच नाही तर तलावावर आक्रमण केलेल्या बेशरम वनस्पतीमुळे याठिकाणी येणाऱ्या वन्यप्राण्यांचा मार्ग देखील खुंटला आहे. वनमहर्षी आणि तत्कालीन विभागीय वनाधिकारी मारुती चितमपल्ली यांनी त्यांच्या कार्यकाळात पक्ष्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी अनेक उपक्रम राबवले. त्यामुळे सारससोबतच स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांसाठी हा परिसर नंदनवन ठरला होता. कालांतराने तो दुर्लक्षित झाला. तलावाच्या काठावर पाण्यात बेशरम वनस्पतीने आक्रमण केले. मागील वन्यजीव सप्ताहात मुख्य वनसंरक्षक व क्षेत्र संचालक रामानुजम यांनी पाण्यात पसरलेल्या बेशरम वनस्पतीने पक्षी आणि प्राण्यांचा मार्ग रोखल्याचे पाहिले. त्यांनी लगतच्या गावातील लोकांचे सहकार्य घेऊन ते काढण्याचा प्रयत्न केला. २१ मार्चला जागतिक वनदिनानिमित्त ही मोहीमच सुरू करण्यात आली. आतापर्यंत तब्बल ९० एकरवरील बेशरम वनस्पती काढण्यात आली आहे. त्यासाठी भंडारा येथील मनीष राजनकर यांनी तांत्रिक सहकार्य केले. त्यांच्यासोबत गावातील जुन्याजाणत्या लोकांनी वनस्पती प्रजाती ओळखून एक कार्यक्रम तयार केला. बेशरम वनस्पती काढलेल्या जागेवर कोणत्या वनस्पती पक्षी आणि प्राण्यांसाठी योग्य राहतील, याची यादी तयार करण्यात आली.

प्रामुख्याने देवधान आणि पाण्यातील वनस्पतीला प्राधान्य देण्यात आले. डॉ. कहालकर यांनी नवीन वनस्पती प्रजाती ओळखण्यास मदत केली आणि आता याठिकाणी पक्षी आणि प्राण्यांसाठी सुंदर अधिवास तयार झाला आहे.

तलावाचे पक्षीवैभव आम्हाला परत आणायचे असून प्राण्यांच्या येण्याचा मार्ग मोकळा करायचा आहे. मार्चपासून सुरू झालेल्या कामाला आता हळूहळू यश येत आहे. अधिवास आता उत्तमप्रकारे तयार होत आहे. वाघासह इतरही प्राण्यांच्या पाऊलखुणा आढळून येत आहेत. पक्ष्यांनी त्यांची घरटी तयार करावीत म्हणून मातीचे पर्वत तयार केले आहेत. एक दिवस सारस देखील याठिकाणी नक्की येतील.

– डॉ. प्रिया म्हैसकर, विभागीय वनाधिकारी, नवेगाव राष्ट्रीय उद्यान