16 January 2021

News Flash

करोनामुक्तांहून नवीन करोनाबाधित तिप्पट

२४ तासांत ८ मृत्यू; ४५२ नवीन रुग्ण नागपूर : जिल्ह्यात गुरुवारी १५० व्यक्ती करोनामुक्त झाले, तर त्याहून तिप्पट म्हणजे ४५२ नवीन रुग्णांची भर पडली. याशिवाय

२४ तासांत ८ मृत्यू; ४५२ नवीन रुग्ण

नागपूर : जिल्ह्यात गुरुवारी १५० व्यक्ती करोनामुक्त झाले, तर त्याहून तिप्पट म्हणजे ४५२ नवीन रुग्णांची भर पडली. याशिवाय २४ तासांत जिल्ह्यात ८ मृत्यूची नोंद करण्यात आली.

नवीन बाधितांमध्ये शहरातील ३९९, ग्रामीण ५२, जिल्ह्याबाहेरील १ अशा एकूण ४५२ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे आजपर्यंतच्या शहरातील बाधितांची संख्या ८७ हजार १५३, ग्रामीण २२ हजार ५०५, जिल्ह्याबाहेरील ६७४ अशी एकूण १ लाख १० हजार ३३२ वर पोहचली आहे.  दिवसभरात शहरातील ५, ग्रामीणचे २, जिल्ह्याबाहेरील १ असे ८ रुग्ण दगावले. त्यामुळे आजपर्यंत शहरात दगावलेल्यांची संख्या २ हजार ५१५, ग्रामीण ६२१, जिल्ह्याबाहेरील ४९२ अशी एकूण ३ हजार ६२८ वर पोहचली आहे.  दिवसभरात शहरातील १०३, ग्रामीण ४७ असे एकूण १५० व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे आजपर्यंत शहरातील करोनामुक्तांची संख्या ८० हजार ३९५, ग्रामीण २१ हजार ४९४ अशी एकूण १ लाख १ हजार ८८९ वर पोहचली आहे.

विमानतळावरील प्रवाशांकडून शुल्क किती?

शासनाने दिल्ली, गुजरात, राजस्थान, गोवा या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना प्रवासापूर्वी करोना चाचणी व त्याचा नकारात्मक अहवाल ठेवणे अनिवार्य केले आहे. चाचणी न करणाऱ्यांसाठी नागपूर विमानतळावर नागपूर महापालिकेकडून ध्रुव पॅथॉलॉजी, मेट्रोसह इतरही काही प्रयोगशाळेचे तंत्रज्ञ तैनात केले आहेत. दरम्यान, विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांकडून प्रती व्यक्ती आरटीपीसीआर चाचणीचे १,६०० ते १,८०० रुपये घेतले जात असल्याचे अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे गजानन पांडे यांनी सांगितले. हे शुल्क शासनाने खासगी प्रयोगशाळेसाठी निश्चित केलेल्या दराहून अधिक आहेत.  शासनाने लॅबमध्ये नमुने देणाऱ्यांकडून ९८०, कोव्हिड सेंटरमधून नमुने देणाऱ्यांकडून १,४०० तर घरून नमुने देणाऱ्यांकडून त्याहून थोडे अधिक शुल्क आकारण्याची मुभा दिली आहे. अध्यादेशात विमानतळावरून नमुने घेण्याचे शुल्क नमुद नसल्याने खासगी प्रयोगशाळांचे फावले आहे.

दिल्लीहून आलेले  १२ प्रवासी करोनाग्रस्त

दिल्लीहून विमानाने आलेल्या  १०३ प्रवाशांची चाचणी केली  असताना त्यातील १२ प्रवासी करोनाग्रस्त असल्याचे आढळले.  महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात या विमानाने किंवा रेल्वेने येणाऱ्या सर्व  रुग्णांच्या संपर्कातील सर्वांना करोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार, रेल्वेस्थानकावर  १२०० प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग करण्यात आली. सर्वांचे अहवाल नकारात्मक आले.

सक्रिय रुग्णांची  संख्या ४,८१५ 

शहरात गुरुवारी ४ हजार २४३, ग्रामीणला ५७२ असे एकूण ४ हजार ८१५ सक्रिय करोनाबाधित नोंदवले गेले. त्यातील १ हजार ९१ गंभीर रुग्णांवर विविध रुग्णालयांत तर ३ हजार २७२ बाधितांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू आहेत.

नऊ हजारांवर चाचण्यांचा उच्चांक

शहरात दिवसभरात ६ हजार ७३८, ग्रामीणला २ हजार ३७८ अशा एकूण ९ हजार ११६  चाचण्या करण्यात आल्या. हा एका दिवसातील चाचण्यांचा आजपर्यंतचा उच्चांक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2020 1:49 am

Web Title: corona positive patient corona virus infection
टॅग Coronavirus
Next Stories
1 गडचिरोलीतील पोलीस पत्नीला गृहमंत्र्यांच्या पत्नीचे पत्र
2 गोरेवाडा बचाव केंद्रातून सर्व वन्यप्राणी स्थानांतरित
3 महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवर ‘सारस संमेलन’
Just Now!
X