२४ तासांत ८ मृत्यू; ३०१ बाधितांची भर

नागपूर : करोनाचा उद्रेक कमी झाल्यावर दुसऱ्यांदा नागपूरच्या ग्रामीण भागात शून्य करोनाबळी नोंद झाली. याशिवाय २४ तासांत  ८ मृत्यूंसह ३०१ नवीन बाधितांची नोंद झाली.

दगावलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ४, जिल्हाबाहेरील ४ अशा एकूण ८ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूंची संख्या २ हजार ४३८, ग्रामीण ५७७, जिल्हाबाहेरील ४३२ अशी एकूण ३ हजार ४४७ वर पोहचली आहे. जिल्ह्य़ात दिवसभरात आढळलेल्या ३०१ नवीन रुग्णांत शहरातील १६८, ग्रामीणचे १२९, जिल्ह्य़ाबाहेरील ४ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या ८२ हजार ३९४, ग्रामीण २१ हजार १६९, जिल्ह्य़ाबाहेरील ६१४ अशी एकूण १ लाख ४ हजार १७७ वर पोहचली आहे.

उपचाराखालील रुग्णसंख्या ३,५९८

येथील शहरी भागात गुरुवारी २ हजार ६८२, ग्रामीणला ९१६ असे एकूण ३ हजार ५९८ रुग्ण उपचाराखाली आहेत. त्यातील ९६५ रुग्णांवर विविध रुग्णालयांत, २ हजार ३३२ रुग्ण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत.

विदर्भातील मृत्यू

(५ नोव्हेंबर)

जिल्हा                  मृत्यू

नागपूर                   ०८

वर्धा                        ००

चंद्रपूर                     ०७

गडचिरोली               ०२

यवतमाळ                 ००

अमरावती                ०२

अकोला                    ००

बुलढाणा                 ०१

वाशीम                    ००

गोंदिया                   ०१

भंडारा                     ०१

एकूण                     २२