करोना काळातही निवडणुकीवर लक्ष

नागपूर : शहरात लसीचा तुटवडा आणि करोना चाचणी करण्यासाठी वैद्यकीय साधनाची कमतरता असताना विविध पक्षाचे नगरसेवक  लसीकरण आणि कोविड चाचणी केंदांवर उपस्थित राहून व छायाचित्र काढून घेत चमकोगिरी करीत असल्याने नाराजी व्यक्त के ली जात आहे.

पुढील वर्षी महापालिके च्या निवडणुका आहेत. इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू के ली असली तरी दोन वर्षांपासून करोनाच्या साथीमुळे त्यांना जाहीरपणे लोकसंपर्क  करणे अवघड झाले आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान लसीकरण मोहिमेने त्यांना ही संधी आयती मिळाली. सत्ताधारी भाजप तसेच विरोधी पक्षाचे नगरसेवक त्यांच्या प्रभागात लसीकरण मोहीम राबवू लागले आहेत तसेच कोविड चाचणी शिबिराचे आयोजन करू लागले आहेत. त्याची प्रसिद्धी व प्रचार मोठ्या प्रमाणात के ला जात आहे. लसीकरण केंद्रावर लस घेणाऱ्यांसोबत स्वत:चे आणि पक्षाचे चिन्ह असलेले छायाचित्र काढले जात आहे. ते समाजमाध्यमांवर टाकले जात आहे. प्रभागातील विविध भागात  फलक लावले जात असून कें द्राचे थाटामाटात उद्घाटन केले जात आहे.

४५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि १८ ते ४५ वर्षे वयोगटासाठी शहरात लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी वेगवेगळ्या भागात लसीकरण व चाचणी केंद्र स्थापन केले आहे. सध्या  लसींचा तुटवडा आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी गेल्या दोन दिवसांपासून लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. मोजक्या केंद्रावर लसीकरण सुरू आहे. लसींची मात्रा वाढवावी व जास्तीत जास्त ती लोकांपर्यंत पोहचावी यासाठी प्रयत्न करण्याऐवजी राजकीय पक्ष विशेषत: भाजपकडून लसीकरणाचे राजकारण के ले जात आहे. अनेक कें द्र जी नगरसेवकांनी सुरू के ली होती ती बंद पडली आहेत. आता आम्ही कुठे जावे, अशी विचारणा नगरसेवकांना करू लागले आहेत.

दोन आठवड्यापूर्वी प्रतापनगरमध्ये नगरसेवकांनी लसीकरण केंद्र सुरू केले. मात्र  तेथील कार्यकर्ता करोनाबाधित झाल्याने केंद्र बंद करण्यात आले. मानेवाडा, जुनी मंगळवारी, नंदनवन, गोकुळपेठ, लक्ष्मीनगर, पांडे लेआऊट, खामला,  धरमपेठ या भागातील लसीकरण केंद्र गेल्या आठ दिवसांपासून बंद आहे. केंद्राच्या बाहेर मोठे पक्षाच्या नावाचे व नगरसेवकांच्या छायाचित्रासह होर्डिंग व फलक लावण्यात आले आहेत.