|| राजेश्वर ठाकरे

प्रस्ताव तयार असूनही प्रशासन उदासीन

नागपूर :  शहरात करोनाचे रुग्ण दिसेंदिवस वाढत असून  खाटा अपुऱ्या पडत आहेत, तर दुसरीकडे शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय व महाविद्यालयात कोविड के अर सेंटर सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासन आणि महाविद्यालय प्रशासन चालचढकल करत आहे. विशेष म्हणजे,

कोविड के अर सेंटरसाठी हॉटेल, मंगल कार्यालयांसारखे सारखे अपारंपरिक पर्याय पडताळून पाहिले जात असताना जिथे प्राथमिक स्वरूपात का होईना वैद्यकीय सुविधा आहेत त्या आयुर्वेदिक रुग्णालयाकडे का दुर्लक्ष केले जातेय, हा प्रश्न अनाकलनीय आहे.

सक्करदरा चौकात हे शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय व महाविद्यालय आहे. येथे ८० खाटांची व्यवस्था असून कोविड के अर सेंटर सुरू करता येणे शक्य आहे.

तसा प्रस्ताव देखील महाविद्यालयाकडून गेला आहे. मात्र, जिल्हा प्रशासन आणि महाविद्यालयातील काही अधिकारी येथे कोविड के अर सेंटर सुरू करण्याबाबत सकारात्मक दिसत नाही. करोना कोविड सेंटरसाठी आवश्यक सुविधा तेवढ्या येथे तयार कराव्या लागतील. परंतु त्यासाठी महाविद्यालय आणि जिल्हा प्रशासन पुढाकार घेण्यास तयार नाही.

परिणामी, शासकीय पायाभूत सुविधा उभी असताना तिचा वापर शून्य आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याशी व्हॅट््सअ‍ॅप आणि लघुसंदेशाद्वारे संपर्क साधला  परंतु प्रतिसाद मिळाला नाही. महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी येथील पायाभूत सुविधा अयोग्य आहेत. त्याची खूप दुरुस्ती करावी लागेल, असे सांगितले. शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय व महाविद्यालयाचे अधिष्ठता ़डॉ. प्रकाश काबरा (प्रभारी) म्हणाले, कोविड के अर सेंटर सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार आहे.

उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी यांना आदेश दिले आहेत की, शहरातील आयुर्वेद रुग्णालयातील खाटा वापरता येतील का बघा. शासकीय महाविद्यालय, के डीके  कॉलेज आणि श्री आयुर्वेदिक कॉलेजची पाहणी करायची होती. त्या दृष्टीने आम्ही तयारी करून ठेवली आहे. परंतु अजूनही जिल्हा प्रशासनाने आमच्याशी संपर्क साधलेला नाही.

श्री आयुर्वेदिक कॉलेज आणि के .डी.के . आयुर्वेदिक कॉलेजमध्ये कोविड के अर सेंटर सुरू करण्यात येत आहे. या दोन्ही कॉलेजमध्ये प्राणवायूची पाईप लाईन टाकण्यात येत आहे. शिवाय श्री आयुर्वेदिक कॉलेजमध्ये प्राणवायू प्लॉन्ट टाकण्याची योजना आहे. शासकीय आयुर्वेदिक कॉलेजमध्ये कोविड के अर सेंटर उभारण्यात जास्त खर्च येणार आहे. त्यामुळे तेथे सेंटर उभारण्यात येणार नाही. – दयाशंकर  तिवारी, महापौर

अलीकडेच निधी उपलब्ध झाला आहे. शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय व महाविद्यालयात कोविड के अर सेंटर लवकरच सुरू करण्यात येईल. – डॉ. नितीन राऊत, पालकमंत्री.