News Flash

फडणवीस सरकारचे घोटाळे पुराव्यासह बाहेर काढणार – शेट्टी

सरकार कुठलेही असले तरी राज्यात गेल्या काही वर्षांत जो काही सिंचन घोटाळा झाला आहे

(संग्रहित छायाचित्र)

 

देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील अनेक घोटाळे पुराव्यानिशी बाहेर काढणार असल्याचा इशारा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. फडणवीस सरकारमध्ये बांधकाम कामगार मंडळात तसेच आयटीमध्येही घोटाळा झाला. हे सर्व घोटाळे पुराव्यानिशी बाहेर काढू, असे ते म्हणाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विदर्भ कार्यकारिणीच्या बैठकीसाठी ते शनिवारी नागपुरात आले होते.

सरकार कुठलेही असले तरी राज्यात गेल्या काही वर्षांत जो काही सिंचन घोटाळा झाला आहे. त्याची चौकशी झालीच पाहिजे, जनतेच्या पैशाचे काय झाले याचे सत्य समोर आले पाहिजे,असे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. राज्यातील महाविकास आघाडीने दिलेली कर्जमाफी फसवी असून या कर्जमाफीचा नुकसानग्रस्त शेतक ऱ्यांना फायदा मिळत नसल्याची टीका त्यांनी केली. सिंचनाच्या विषयावर सत्ताधारी किंवा विरोधी पक्षांनी राजकारण करू नये. कर्जमाफीची केलेली घोषणा फसवी असून तिचा फायदा मूळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना होणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2020 12:37 am

Web Title: fadnavis government scams will bring out with evidence abn 97
Next Stories
1 सदर उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला
2 केंद्र सरकारचा जीएमआरच्या कंत्राटावर आक्षेप
3 शालेय बसने विद्यार्थ्यांला चिरडले
Just Now!
X