26 September 2020

News Flash

मुंबईत करोना वाढल्याने राज्यपाल नागपूर मुक्कामी?

बुधवारी २२ जुलैला दुपारी १२ वाजता त्यांचे आगमन होत आहे

संग्रहित छायाचित्र

मुंबईत करोनाची साथ वाढल्याने व विषाणूने राजभवनात शिरकाव केल्याने  राज्यपाल भगतसिंह कोशियारी नागपूरला काही दिवसांच्या मुक्कामासाठी येत असल्याची माहिती आहे.

बुधवारी २२ जुलैला दुपारी १२ वाजता त्यांचे आगमन होत आहे. विशेष म्हणजे, दौऱ्यात त्यांच्या परतीच्या प्रवासाचा उल्लेख नाही. तसेच सार्वजनिक कार्यक्रम किंवा बैठकीला ते उपस्थित राहणार असल्याचेही नमूद नाही.

जुलैच्या दुसऱ्या आठवडय़ात करोना राजभवनापर्यंत पोहोचला. तेथील १६ कर्मचारी बाधित झाले.  त्या तुलनेत नागपूर सुरक्षित आहे. त्यामुळे राज्यपाल काही दिवस नागपूरला राजभवनात मुक्कामी राहण्याची शक्यता आहे.

यासंदर्भात राजभवनातील अधिकारी  रमेश येवले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘हे राज्यपालांचे निवासस्थान आहे. ते येथे कधीही येऊन राहू शकतात.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 12:12 am

Web Title: governor stays in nagpur due to increase in corona in mumbai abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 करोना रोखण्यासाठी टाळेबंदी हा पर्याय नाही!
2 ‘पब्जी’च्या नादात १३ वर्षीय मुलाची आत्महत्या
3 साहिल सय्यद प्रकरणात पोलिसांच्या तपासावर विश्वास
Just Now!
X