Tax dues in NMC, tax defaulters in inagpur, tax defaulters

मालमत्ता आणि पाणी कर थकविणाऱ्यांसाठी वारंवार सवलतीच्या योजना राबवूनही अनेकांनी त्याकडे पाठ फिरविल्याने अखेर महापालिकेने मंगळवारपासून थकबाकीदारांच्या घरापुढे ढोलवादन करण्याचा व थकबाकीदारांना पुष्पगुच्छ देण्याचा अभिनव असा उपक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे.

महापालिकेने प्रथमच करवसुलीसाठी असा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला असून मंगळवारी १० प्रमुख थकबाकीदारांच्या घरापुढे किंवा प्रतिष्ठानासमोर महापालिकेचे कर्मचारी ढोलवादन करतील. थकबाकीदारांच्या यादीत एम्प्रेस मॉलचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे.

त्यांच्याकडे पाणी कराचे तब्बल ३५ कोटी २३ लाख ५० हजार ४३० रुपये, तर मालमत्ता कराचे २५ कोटी थकित आहे. त्यामुळे उद्या, मंगळवारी शुक्रवारी तलावाजवळील एम्प्रेस मॉलसमोर ढोल वाजविले जातील. थकबाकीदारांच्या यादीत महाविद्यालये, विविध संस्था, खासगी कंपन्या, पेट्रोल पंप आदीचा समावेश आहे.

शहरात ३ लाख ७० हजार थकबाकीदारांनी मालमत्ता कर आणि पाणी कराची ४३२ कोटी रुपयांची रक्कम थकवली आहे. त्यांच्यासाठी ७ ऑगस्टपर्यंत अभय योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे या योजनेकडे जे थकबाकीदार पाठ फिरवतील त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याची मोहीम ८ ऑगस्टपासून सुरू केली जाणार आहे, तर थकबाकीदाराच्या नळजोडण्या खंडित करण्यासाठी ५० पथक तयार करण्यात आले आहे, असे सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी सांगितले. दरम्यान, पहिल्या दिवशी १२०२ ग्राहकांनी पाण्याच्या करापोटी ४० लाख २४ हजार ४१८ जमा केले.

पहिल्या दिवशीचा थकबीदादीराची वसुली

मालमत्ता कर – एकूण लाभार्थी ११०८ (सर्व झोन) – भरलेली रक्कम ७६.१२ लाख

पाणी कर –       एकूण लाभार्थी  १२०२  (सर्व झोन) – भरलेली रक्कम ४० लाख २४ हजार ४१८

 

थकबाकीदारांची यादी (मालमत्ता कर)

झोन                             थकबाकीदार                        रक्कम

लक्ष्मीनगर      सरदारजी की रसोई (काचीपुरा)     ५६ लाख २२ हजार

धरमपेठ कंट्रीवाईड टुर्स (धरमपेठ)  १६ लाख

धंतोली एम्प्रेस मॉल     २ कोटी ६० लाख, ६० हजार ९८०

नेहरूनगर       गिरीजाशंकर पांडे, स्नेहलता भागवत (सक्करदरा)    २५ लाख १० हजार ५८०

गांधीबाग       विजय साखरकर, आनंद चोपकर (चिटणीस पार्क)    १४ लाख ९८ हजार २२८

सतरंजीपुरा      हरी विश्वनाथ, हेमराज भिसीकर (लेंडी तलाव)       ६ लाख २७ हजार

आशीनगर      नागपूर हाऊसिंग अ‍ॅण्ड कोहिनूर वायर (पिवळी नदी)  १९ लाख २४ हजार ३२६

मंगळवारी       डॉ. जुलेखा इकबाल दौड (गोरेवाडा)  १२ लाख ७९ हजार २०४

 

पाणी कर थकबाकीदार

लक्ष्मीनगर      विठ्ठल भांगे लक्ष्मीनगर,  १ लाख ७१ हजार ५१७

धरमपेठ               बिदलराम फुलसुंगे, तेलंगखेडी     ३ लाख ७७ हजार १३५

हनुमानगर      श्रीधर राजगे, नरेंद्रनगर   ३९ हजार ५९५

धंतोली         बिंदू दुर्गा तुरकोल, सिरसपेठ      ८१ हजार ४३३

नेहरूनगर       तानबा पाटील, जुना सक्करदरा     ६९ हजार ६००

गांधीबाग              एस.जी. हरदास, इतवारी ३३ हजार ५००

सतरंजीपुरा      विदर्भ पॅलेस, चांभारनाला  १ लाख ५१६

लकडगंज              ललित पटेल, लकडगंज   ५४ हजार १९०

आशीनगर             चिकमचंद मनकानी, जरीपटका    १ लाख ३१ हजार ९५६

मंगळवारी              मोहनसिंग पंजाबी, कडबी चौक     ३ लाख ३८ हजार ६८२

एमसीएम पूनम चेंबर छावनी      ४० लाख ८१ हजार ३३४