चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा; ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन

नागपूर :  राज्य सरकारची आता ओबीसी आरक्षण मिळवून देण्याची मानसिकता नाही. त्यामुळे आता यापुढे भाषणे  देऊन उपयोग नाही. आज रस्ते बंद करू व यापुढे मंत्र्यांना रस्त्याने फिरू देणार नाही, असा  इशारा भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. त्यांच्या नेतृत्वात बुधवारी मानेवाडा चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. शहर व जिल्ह्य़ातील विविध मतदारसंघात आंदोलन करत राज्य सरकारमधील नेत्यांचे पुतळे जाळून निषेध करण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ओबीसींच्या आरक्षणाशिवाय राज्यात पाच जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींसाठी निवडणुका होत आहेत. ठाकरे सरकारच्या निष्क्रियतेमुळेच ओबीसींचे आरक्षण गेल्याचा आरोप करत बुधवारी शहरातील सहा विधानसभा मतदारसंघांसोबतच जिल्ह्य़ात भारतीय जनता पक्षाच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जागोजागी पुतळे जाळत सरकारचा निषेध केला. मानेवाडा चौकात  रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. चारही बाजूने रस्त्यावर ठिय्या आंदोलन केल्यामुळे काही वेळ  वाहतूक खोळंबली होती.

पोलिसांनी बावनकुळे यांना बळजबरीने  रस्त्यावरुन उठवले. त्यामुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली. यावेळी पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध करण्यात आला.

मानेवाडा चौकात झालेल्या आंदोलनात शहर अध्यक्ष प्रवीण दटके,आमदार मोहन मते, माजी आमदार सुधाकर कोहळे , विठ्ठल भेदे, रमेश चोपडे, देवेंद्र  दस्तुरे, अजय बोधारे, मध्य नागपुरात झेंडा चौक परिसरात महापौर दयाशंकर तिवारी, आमदार विकास कुंभारे, अर्चना डेहनकर , पश्चिम नागपुरात  गिट्टीखदान चौकात माजी आमदार सुधाकर देशमुख, अनिल सोले, संजय बंगाले, दक्षिण-पश्चिम मतदारसंघात संभाजी चौकात आमदार रामदास आंबटकर, माजी महापौर नंदा जिचकार यांच्यासह अविनाश ठाकरे, संदीप जोशी, डॉ. उपेंद्र कोठेकर, प्रकाश भोयर, किशोर वानखेडे, पारेंद्र पटले, उत्तर नागपूरात कांजी