अशोक बावाजी, बाल्या माने, नौशाद, गुलाम यांची मदत

महापालिका निवडणुकीसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्याला आता अवघे चार दिवस उरले असल्याने प्रचार शिगेला पोहोचला आहे. विजय संपादन करण्यासाठी उमेदवार साम, दाम, दंड, भेद आदी पातळयांवर मोर्चेबांधणी करीत असून त्यासाठी कुख्यात गुंडांचा वापर करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून नागपूर महापालिका निवडणुकीत गुंड काही उमेदवारांचा प्रचार करीत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

Lok Sabha polls West Bengal elections
ममतादीदी आणि भाजपा आमनेसामने; एनआयएवरील हल्ल्याचं नेमकं प्रकरण काय?
Adam Master, adam master solapur
घरकुलांचे श्रेय घेणाऱ्या भाजपला फटकारत आडम मास्तर प्रणिती शिंदेंच्या पाठीशी, पारंपरिक प्रतिस्पर्धी आले एकत्र
Pratibha Dhanorkar
प्रतिभा धानोरकरांनी ‘हातउसने’ घेतले ३९ कोटी! निवडणूक आयोगाला दिलेल्या संपत्ती विवरणातील तपशील
pratibha dhanorkar
काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांकडे ३९ कोटींचे ‘हातउसने’!

नागपूर महापालिकेत सर्वच राजकीय पक्षांनी गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या लोकांना उमेदवारी दिली. त्यामुळे उमेदवारच गुंड असल्याने प्रचार करणारेही गुंड प्रवृत्तीचे राहतील, असे प्रत्येकाला ठाऊक होते. आता गुंड समोर येऊन आपल्या उमेदवाराचा प्रचार करीत आहेत. यात प्रामुख्याने प्रभाग-१९ मधून उभे असलेले काँग्रेसचे उमेदवार तौसिफ अब्दुल वहीद अहमद याच्यावर खुनाचा प्रयत्न करणे, विनयभंग करणे, महिलेला पळवून नेणे आदी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचा प्रचार कुख्यात अशोक बावाजी करीत आहेत. बावाजी याचा इतवारी रेल्वे स्थानक परिसरात मोठा जुगार अड्डा आहे. याशिवाय तो प्रभाग-२१ मधील काँग्रेसचे उमेदवार कुख्यात इरशाद ऊर्फ पहेलवान इस्माईल अली याचाही प्रचार करीत आहे. प्रभाग-१९ मधील भाजपच्या दिग्गज उमेदवारासाठी कुख्यात नौशाद हा प्रचारात उरतल्याची माहिती आहे. नौशाद आणि तौसिफ हे एकेकाळी चांगले मित्र होते. परंतु, काही महिन्यांपूर्वी तौसिफच्या तक्रारीवरून नौशादविरुद्ध गुन्हा दाखल झाला आणि त्याला कारागृहात जावे लागले होते. सध्या तो जामिनावर कारागृहाबाहेर आले. त्याचा भाऊ इप्पा हा फरार आहे. अशात तौसिफ हा काँंग्रेसच्या तिकिटावर उभा असल्याने नौशाद हा भाजपला सहकार्य करीत असल्याची माहिती आहे. त्याच्याविरुद्ध खून, मारहाण, खुनाचा प्रयत्न, अवैध शस्त्रे बाळगणे आदी गुन्हे दाखल आहेत. गार्डलाईन परिसरात चालणारा जुगार अड्डा हा त्याचाच असल्याचे सांगण्यात येते.

या शिवाय प्रभाग-६ येथील उमेदवार हलीमा प्यारेसाहाब अशरफी यांचा मुलगा गुलाम याची गुन्हेगारी पाश्र्वभूमी आहे. त्याच्याविरुद्ध भूखंड बळकावणे, मारहाण करणे, गाडी चोरी आदी गुन्हे दाखल आहेत. नुकत्याच घडलेल्या लिटील सरदार गोळीबार प्रकरणात त्याची चौकशी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. त्याच्यासोबत गुल्लू सरदार हा गुंडही सहभागी असल्याचा पोलिसांचा संशय असून तो आपली आई हलीमा अशरफी आणि असलमुल्ला यांचा प्रचार करीत आहे.

सीताबर्डी परिसरातील कुख्यात गुंड बाल्या माने हा प्रभाग-१६ मधील भाजपचे उमेदवार संदीप जोशी आणि प्रभाग-१७ चे भाजप उमेदवार प्रमोद छत्रपाल चिखले यांचा प्रचार करीत आहे. मानेवर गणेशपेठ पोलीस ठाण्यांतर्गत दोन खुनांसह एकूण सहा गुन्हे दाखल आहेत. याशिवाय शुक्रवारी पश्चिम नागपुरातील भाजप उमदेवारांच्या प्रचाराकरिता आमदार सुधाकर देशमुख यांच्यासोबत कुख्यात गुंड संजय फातोडे हा प्रचार करताना दिसला. तो एका मोक्का प्रकरणात नुकताच जामिनावर कारागृहाबाहेर आलेला आहे.

सीताबर्डीतील भाजपच्या सभेत बाल्या माने

शुक्रवारी सकाळी सीताबर्डी परिसरातील गोयलगंगा मॉलमध्ये सीताबर्डी व्यापारी असोशिएशतर्फे सभा घेण्यात आली. या सभेला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. या सभेत कुख्यात बाल्या माने उपस्थित होता आणि त्याने इतरांप्रमाणे गडकरी यांच्या खांद्यावर भाजपचा कमळ चिन्ह असलेला दुपट्टा घालून त्यांचे स्वागत केले. ही सभा पश्चिम नागपुरातील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आली होती, हे विशेष.