News Flash

अस्वच्छता अन् साथीच्या आजारांचा विळखा!

रेल्वे स्थानकावरील चांभार नाल्यावरील पुलापासून ते पुढे रिंगरोडवरील पुलापर्यंत हा प्रभाग विस्तारला आहे.

प्रभाग क्रमांक ५

प्रभाग क्रमांक पाचमध्ये उत्तर मध्य नागपूरच्या अनेक भागांचा समावेश असून या भागांमध्ये बिनाकी मंगळवारी तलावाची घाण, वस्त्यांमध्ये घाणीचे साम्राज्य, अवैधपणे चालणारे देशी दारूचे अड्डे, रस्त्यांवर भरणारा बाजार, अनधिकृत झोपडपट्टय़ा, पथदिवे आणि अनधिकृत ले-आऊट्स आदी समस्या भेडसावत आहेत. या सर्व परिस्थितीमध्ये नागरी आरोग्य धोक्यात आलेआहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये या समस्या सोडविण्याला प्राधान्य देण्यात येणार का? असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.

उत्तर नागपूर व मध्य नागपूरचा काही भाग या मतदारसंघात आहे. हा प्रभाग शेजारच्या विद्यमान प्रभागातील अनेक भाग तोडून नव्याने तयार करण्यात आला. येथे उमेदवाराला प्रचार करताना चांगलीच दमछाक होणार आहे. उत्तरेकडील इतवारी रेल्वे स्थानकावरील चांभार नाल्यावरील पुलापासून ते पुढे रिंगरोडवरील पुलापर्यंत हा प्रभाग विस्तारला आहे.

पूर्वेच्या दिशेने चांभार नाला ते आग्नेयकडे जुनी कामठी रोडपर्यंत वळण घेत पुढे छिंदवाडा छोटी रेल्वेलाईन आणि मुंबई-हावडा रेल्वे मार्गापर्यंत वाढला आहे. दक्षिण दिशेला इतवारी रेल्वेचा भुयारी मार्ग, नैऋत्य दिशेने इतवारा रेल्वेस्टेशनपर्यंत, त्यानंतर पुढे बादशाह मेडिकल स्टोअर्सपर्यंत या प्रभागाची सीमा आहे. उत्तर दिशेने शांतीनगर रोडवरील कॉलनी चौकापर्यंत वाढत बिनाकी मंगळवारी उड्डाणपुलापर्यंत विस्तारला आहे. या प्रभागाचे सध्या किशोर डोरले, सिंधू उईके प्रतिनिधित्व करीत आहेत. गेल्या अनेक निवडणुकांत डोरले हे अपक्ष लढले आणि निवडूनही आले.

आरक्षणावर एक नजर

अ- अनुसूचित जाती (महिला)

ब- अनुसूचित जमाती

क- ओबीसी (महिला)

ड- सर्वसाधारण

मतदार

एकूण मतदार  – ६४,४८२

अनुसूचित जाती      – १३,१०५

अनुसूचित जमाती     – १२,७६८

प्रभागाची रचना

बिनाकी मंगळवारी, आनंदनगर, हुडको क्वॉर्टर्स, संजय गांधीनगर, इंदिरा मातानगर, भोलानगर, मेहंदीबाग कॉलनी, जामदार वाडी, ईश्वर देशमुख ले-आऊट, किनखेडे ले-आऊट, वृंदावननगर, जोशीपुरा, जय भोलेनगर, कुंदनलाल गुप्तानगर, नामदेवनगर, अत्रेनगर, इंदिरानगर, बोहरा कब्रस्तान, पाच क्वॉटर्स, पंचवटीनगर, कावरापेठ, शांतीनगर, रामसुमेरनगर, बाबानगर, मुदलीयारनगर.

विकासाकडे लक्ष द्या

या प्रभागात अनेक झोपडपट्टय़ा आहेत. त्यामुळे येथे मूलभूत सोयींचा अभाव आहे. शुद्ध पिण्याच्या पाण्याचा अभाव, जागोजागी फुटलेल्या मलवाहिन्या, उखडलेले रस्ते, रस्त्यावरील पार्किंग आदी समस्यांनी प्रभागातील नागरिक ग्रासले आहेत. या भागाच्या विकासाच्या दृष्टीने उमेदवारांनी कामे करायला हवी.

– गोविंद केडवदकर, नागरिक

पिण्याच्या पाण्याची समस्या

प्रभागात शुद्ध पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे. कुंदनलाल गुप्तानगर आणि लगतच्या परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य आहे. मलवाहिनीचे घाण पाणी ठिकठिकाणाहून झिरपत असून नागरी आरोग्य धोक्यात आले आहे. या समस्यांना प्राधान्याने सोडविण्याची आवश्यकता आहे. परिसरात पथदिव्यांचीही समस्या मोठी असून रात्रीच्या सुमारास महिलांची सुरक्षा धोक्यात येण्याची चिंता असते.

– जितेंद्र मोहाडीकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

दिलेली आश्वासने पाळली

मागील निवडणुकीत मतदारांना दिलेले आश्वासन पाळले आहे. दोन वार्डाचा प्रभाग असताना नवीन रस्त्याचे बांधकाम, नवीन मलवाहिनी टाकण्याचे काम केले. पथदिव्यांसाठी नवीन विजेचे खांब बसविले. मतदार आपल्या कामावर खूष असून गेल्या अनेक वर्षांपासून आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढत आहोत आणि निवडूनही आलो. कामाच्या भरवशावरच अपक्ष म्हणून निवडून येऊ शकतो. यंदा चार वार्डाचा एक प्रभाग झाला असून आपण कॉंग्रेसशी संपर्क केला होता. मात्र, आपल्या इच्छेनुसार चारही उमेदवार दिले तर आपण कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढू. अन्यथा अपक्ष म्हणूनच लढणार.

– किशोर डोरले, विद्यमान नगरसेवक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 3:29 am

Web Title: nagpur municipal corporation ward no 5 detail
Next Stories
1 नोटाबंदीचा रॉकेलच्या पुरवठय़ावर परिणाम..
2 ‘हागणदारीमुक्त महाराष्ट्र’साठी शौचालय बांधणीला गती देण्याची गरज
3 वन्यजीव कायदा आणि वन खात्याची उदासीनता !
Just Now!
X