नागपूर रेल्वेस्थानकावर कारवाई
अधिसूची एकमधील कॉमन हिल मैनासह आठ पक्ष्यांच्या तस्करीचे प्रकरण रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आले. या पक्ष्यांना वनखात्याच्या सुपूर्द करण्यात आले असून इतर पक्ष्यांची ओळख पटवणे सुरू आहे. दुपारच्या सुमारास नागपूर रेल्वेस्थानकावर ही कारवाई करण्यात आली.
नागपूर रेल्वेस्थानकावर काही वर्षांपूर्वी मोठय़ा प्रमाणांवर पोपटांची तस्करी रेल्वे पोलीस दलाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली होती. त्यानंतर कासवांची तस्करीही त्यांनी उघडकीस आणली. त्यानंतर आज, शनिवारी दानापूर-सिकंदराबाद एक्सप्रेस नागपूर रेल्वे स्थानकावर थांबली असताना रेल्वे पोलीस दलाच्या जवानांनी नेहमीप्रमाणे गस्त केली. या गस्तीदरम्यान त्यांना एका डब्यात बर्थखाली पिंजरा आणि टोपली दिसून आली. पिंजऱ्यात कॉमन मैना या पक्ष्यासह पाच पक्षी व टोपलीत तीन पक्षी असे एकूण आठ पक्षी आढळून आले. त्यांनी त्वरित पक्षी जप्त करून वनखात्याला सूचना दिली. लष्करीबागचे क्षेत्र सहाय्यक आदमने यांना सेमिनरी हिल्सचे वनपरिक्षेत्र अधिकारी पाटील यांनी रेल्वेस्थानकावर पाठवले. यावेळी बचाव पथकाचे वनपाल खळतकर, वनरक्षक इवनाते आदी रेल्वेस्थानकावर पोहोचले. त्यांनी पंचनामा करून ते सर्व पक्षी ताब्यात घेतले आणि सेमिनरी हिल्सवरील ट्रान्झिट टिटमेंट सेंटरमध्ये आणले.
संग्रहित लेख, दिनांक 21st Aug 2016 रोजी प्रकाशित
कॉमन हिल मैनासह आठ पक्ष्यांची तस्करी उघडकीस
अधिसूची एकमधील कॉमन हिल मैनासह आठ पक्ष्यांच्या तस्करीचे प्रकरण रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आले.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 21-08-2016 at 03:41 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur police open bird smuggling case