केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

नागपूर : निवडणुका जिंकण्यासाठी काही तडजोडी कराव्या लागतात. त्यामुळे अनेकदा कार्यकर्त्यांवर अन्याय होतो, पण अश तडजोडी पक्षाच्या हितासाठी असतात, असा कानमंत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना दिला आणि आगामी निवडणुका जिंकण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहनही केले.

आज गुरुवारी बुथ प्रमुखांच्या संमेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. १९४७ नंतर राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यावर सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात विकासाचे नवीन मॉडेल तयार झाले. त्या दृष्टीने आपण आपल्या कार्यक्रमाची आखणी केली पाहिजे. संघटनेत कार्यकर्त्यांचे संबंध कसे असावेत हे आपण समजून घेतले पाहिजे. विरोधकांची नीती काय हे समजून घ्या. ६० वर्षांत त्यांनी जे करून दाखवले नाही, ते आपण पाच वर्षांत करून दाखवले. त्यामुळेच विरोधक आता जातीयवाद, सांप्रदायिक वादाचा आधार घेत आहेत, असा आरोपही गडकरी यांनी केला. काँग्रेसने ६० वर्षे या देशावर राज्य केले, पण जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत. रशियन विचारधारेच्या आधारावर आर्थिक नीती या देशात राबवून साम्यवाद, साम्राज्यवादाची बीजे रोवली गेली, याकडेही गडकरींनी लक्ष वेधले.

राहुल स्वत:ला न्यायालयापेक्षाही मोठा समजतात -रावत

नागपूर : तत्कालीन पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या काळात केंद्राकडून निघालेल्या एका रुपयांमधील केवळ १८ पैसे गरिबांपर्यंत  पोहोचत होते. मात्र, आता एका रुपयातील ९९ पैसे पोहोचतात. असे असतानाही राहुल गांधी ‘राफेल’वर अडून बसले आहेत. सर्वोच्च न्यायालयापेक्षाही ते स्वत:ला मोठे समजत आहेत, अशी टीका उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी केली.

भाजपच्या नागपूर, रामटेक आणि भंडारा लोकसभा मतदारसंघातील बुथ प्रमुखांचा मेळावा आज गुरुवारी रेशीमबाग येथील कवी सुरेश भट सभागृहात पार पडला. यावेळी ते बोलत होते.

रावत म्हणाले, नागपूर ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमी असून, कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचे सामथ्र्य या भूमीत आहे. सामर्थ्यांपुढे जग नमते, हे याच काळात सिद्ध झालेम्. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प ‘मोदी मॉडेल’ अंमलात आणतात, यूएईमध्ये मंदिराची उभारणी होते आणि डोकलाममधून चीनला माघार घ्यावी  लागते. हे सामथ्र्य मोदींमुळेच प्राप्त झाले.  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाकिस्तानचे पाणी बंद केले. एवढी हिंमत आजवर कोणत्याही मंत्र्याने दाखवली नाही. गडकरी हे विकासाचा पर्याय ठरले, असेही ते म्हणाले.