पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांचे मत

दुर्लक्ष आणि धार्मिक पिळवणुकीमुळे देशात दहशतवाद फोफावत असून, जात, धर्म आणि प्रांत यावरून होणाऱ्या वादाची ज्यांना झळ पोहोचते अशा घटकांना दहशतवादी संघटनांचे सहकार्य मिळते, असे मत राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी व्यक्त केले.

दीक्षित यांनी पदाचा कार्यभार स्वीकारताच ते नागपूर दौऱ्यावर आले आहेत. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्य़ाला त्यांनी भेट दिली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी लोकसत्ताह्णशी बोलताना विविध मुद्यांवर आपली मते मांडली.

दीक्षित यांनी दहशतवाद वाढण्याची कारणे विशद केली. ते म्हणाले,ह्व देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि राज्यातील इतरही महानगरे ही नेहमीच दहशतवाद्यांच्या ‘हिटलिस्ट’वर राहिलेली आहेत. आज दहशतवादी संघटनांमध्ये उच्चशिक्षित आणि तंत्रज्ञान अवगत असणारे तरुण, तरुणी धर्मयुद्धाच्या नावाखाली सहभागी होत आहेत. त्यातून आयएसह्णसारखी दहशतवादी संघटना जन्माला आली. मात्र, त्यांना तोंड देण्यासाठी राज्यातील पोलीस दल सक्षम आहे. पोलिस यंत्रणेला अत्याधुनिक होण्याची गरज असून, त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. पोलीस व नागरिकांमधील संवाद अधिक घट्ट करण्यासाठी पोलिस मित्रह्ण नावाची संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला. ही संकल्पना सर्वप्रथम मी नागपुरात पोलिस आयुक्त असताना राबविलेली होती.ह्व

ह्लआज प्रत्येक शहरात महिलांचे दागिने पळविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या गुन्ह्य़ांमध्ये चांगल्या घरच्या व्यसनाधीन मुलांचे प्रमाणही अधिक आहे. अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांनाही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. लहान मुलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये झालेली वाढही चिंताजनक असून, त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना सर्वसामान्य नागरिकांची मदत घ्यावी लागेल. वाहतूक कोंडी दूर करण्याचे काम केवळ वाहतूक पोलिसांकडून होणार नाही, तर नागरिकांनाही वाहतूक नियमांचे पालन करावे लागेल. रस्तेही अतिक्रमणापासून मुक्त करावे लागतील. सध्या एकूण रस्त्यांच्या केवळ ३० टक्केच जागा वाहतुकीसाठी वापरली जाते. हे चित्र बदलण्याची गरज आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रस्त्यांचे सर्वेक्षण करून रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश आपण दिले आहेत,ह्व असे दीक्षित यांनी नमूद केले.

स्थलांतरामुळे शहरात गुन्हेगारी

महाराष्ट्र पोलीस दलाचा प्रमुख म्हणून राज्यात कायदा व सुव्यवस्था राखणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. याची विभागणी ग्रामीण आणि शहर अशी करावी लागेल. ग्रामीणच्या तुलनेत शहरी जीवन अधिक असुरक्षित आहे. रोजगारासाठी आज ग्रामीण भागातून शहरांकडे स्थलांतर वाढले आहे. येणाऱ्यांपैकी ५ टक्के लोकच शहरात यशस्वी होतात. उर्वरितांना राहायला साधे घरही मिळत नाही. अशा परिस्थितीत स्थलांतरित झोपडपट्टय़ांमध्ये जागा शोधतात. येथे त्यांच्यावर गुंडांकडून अत्याचार होतो. त्याचा वचपा काढण्यासाठी ते गुन्हेगारी मार्ग पत्करतात. शहरी भागातील गुंड त्यांना वापरून घेतात आणि गुन्हेगारीत वाढ होते. शहरी लोक एखाद्यावर अन्याय होत असेल तरीही मध्यस्थी करीत नाहीत. या उलट, ग्रामीण भागातील चित्र आहे.  त्यामुळे शहरी मानसिकता बदलण्याची गरज आहे. त्यासाठी पोलिसांनीही नागरिकांना मित्र म्हणून वागविले पाहिजे.