News Flash

वेळापत्रक जाहीर; मात्र परीक्षा ‘अ‍ॅप’चा पत्ताच नाही!

करोनामुळे यंदा विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा चार महिने उशिराने सुरू होत आहेत.

फोटो सौजन्य - इंडियन एक्स्प्रेस

विद्यापीठाकडून परीक्षा घेणाऱ्या कंपनीची अद्यापही निवड नाही

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना २५ मार्चपासून सुरुवात होणार असली तरी विद्यापीठाने अद्यापही परीक्षा कुठल्या ‘अ‍ॅप’वरून होणार हे जाहीर केलेले नाही. त्यामुळे विद्यार्थी प्रचंड संभ्रमात आहेत. विशेष म्हणजे, विद्यापीठाने परीक्षा घेणाऱ्या कंपनीची अद्यापही निवड न केल्याने हा सगळा गोंधळ निर्माण झाल्याची माहिती आहे.

करोनामुळे यंदा विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा चार महिने उशिराने सुरू होत आहेत. २५ मार्चपासून बी.एस्सी., बी.कॉम., बीसीए, बी.फॉर्म, बीबीए, बीए, एलएलबी व इतर अभ्यासक्रमांची परीक्षा सुरू होणार आहे. मात्र, परीक्षा कुठल्या ‘अ‍ॅप’वर होणार, परीक्षेचे स्वरूप कसे राहणार याबाबत कुठल्याही सूचना आलेल्या नाहीत. परीक्षा ऑनलाईन होणार एवढीच माहिती विद्यार्थ्यांकडे आहे. मात्र, कशा होणार याची माहिती नसल्याने विद्यार्थी प्रचंड गोंधळलेले आहेत. ऑनलाईन परीक्षेसाठी विद्यापीठाला एका सॉप्टवेअर कंपनीची मदत लागणार आहे. विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या हिवाळी परीक्षा प्रोमार्क कंपनीकडून घेतल्या होत्या. मात्र, या परीक्षा पद्धतीमधील चुका आणि तांत्रिक अडचणींमुळे गोंधळ उडाला होता. त्यामुळे विद्यापीठाने यावेळी ऑनलाईन परीक्षेसाठी नवीन कंपनीची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आठ दिवसांवर परीक्षा आल्यानंतरही विद्यापीठाने अद्याप नवीन कंपनीची नियुक्ती केलेली नाही. शिवाय परीक्षा कुठल्या अ‍ॅपवरून होणार, त्याचे स्वरूप कसे राहणार याचीही माहिती नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारी कशी करावा असा गोंधळ निर्माण झाला आहे.

परीक्षा प्रारूपाबाबतही गोंधळ

ऑनलाईन परीक्षा ५० प्रश्नांची राहणार असून सर्व प्रश्न सोडवावे लागणार आहेत. शिवाय परीक्षेत बहुपर्यायी प्रश्नांसह रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा, आणि लघुत्तरी प्रश्न राहणार असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. मात्र, अद्यापही याची अधिकृत घोषणा झालेली नाही. परीक्षा घेणाऱ्या कंपनीची नियुक्ती झाल्याशिवाय हे स्वरूप ठरणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2021 12:07 am

Web Title: schedule announced but no test app online exam akp 94
Next Stories
1 नुसतेच ‘टाळे’, ‘बंदी’ नाहीच!
2 टाळेबंदीतील सवलती कमी करा
3 करोनामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची प्रशिक्षण पद्धत बदलणार
Just Now!
X