अहमदाबाद पहिल्या क्रमांकावर

देशभरातील स्मार्ट सिटीच्या मानांकन यादीमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून नागपूर शहर पहिल्या क्रमांकावर होते. या आठवडय़ात शहराने  दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. देशभरातील पहिल्या दहा शहरामध्ये नागपूरचा समावेश करण्यात आला आहे.

नागपूर शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करण्यात आल्यानंतर शहरात विविध प्रकल्प राबवले जात आहेत. दर आठवडय़ात देशभरातील स्मार्ट सिटी अंतर्गत असलेल्या शहराचा आढावा घेत केंद्र सरकार मानाकंन घोषित करीत असते. गेल्या सहा महिन्यांपासून नागपूर शहर स्मार्ट सिटीच्या मानांकन यादीत पहिल्या क्रमांकावर होते. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी मात्र अहमदाबाद  ३७१.१७ गुण मिळवून पहिल्या स्थानावर आले तर नागपूरला ३६८. ५५ गुण मिळाले. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात प्रशस्त रस्ते, सर्वोच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा, अत्याधुनिक रुग्णालय, शाळा, पटांगण आणि वाय-फाय सुविधा मिळणार आहे. पूर्व नागपुरातील पुनापूर, पारडी आणि भरतवाडा या भागात स्मार्ट सिटीच्या दृष्टीने १७३० एकर परिसर विकसित करण्यात येईल. या ठिकाणी बांधकाम सुरू झाले आहे.

.स्मार्ट सिटी मानांकनात नागपूर दुसऱ्या स्थानी

शेवटी मात्र अहमदाबाद  ३७१.१७ गुण मिळवून पहिल्या स्थानावर आले तर नागपूरला ३६८. ५५ गुण मिळाले.

स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात प्रशस्त रस्ते, सर्वोच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा, अत्याधुनिक रुग्णालय, शाळा, पटांगण आणि वाय-फाय सुविधा मिळणार आहे. पूूर्व नागपुरातील पुनापूर, पारडी आणि भरतवाडा या भागात स्मार्ट सिटीच्या दृष्टीने १७३० एकर परिसर विकसित करण्यात येईल. या ठिकाणी बांधकाम सुरू झाले आहे.

स्मार्ट सिटी अंतर्गत दर आठवडय़ात केंद्र सरकारकडून आढावा घेतला जातो. यात नागपूर शहर गेल्या सहा महिन्यांपासून पहिल्या स्थानावर होते. यावेळी केवळ चार गुणांनी अहमदाबादपेक्षा मागे पडलो. मात्र पुढील आठवडय़ात महिन्यात पहिल्या क्रमांकावर राहू,असा विश्वास आहे.

– रामनाथ सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी प्रकल्प.