विधान परिषदेवर निवडून आलेले नागपूरचे गिरीश व्यास यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना विधान सभेच्या जिन्यावर बुधवारी पुष्पगुच्छ देण्याचा प्रयत्न केला. परंतु तावडे यांनी पुष्पगुच्छ घेण्यास स्पष्ट नकार देत व्यास यांना पुस्तक देण्याचा पायंडा घालण्याचा सल्ला दिला. प्रसिद्धीमाध्यमांच्या समोर हा प्रकार घडल्याने व्यास तातडीने तेथून निघून गेले.
गिरीश व्यास बुधवारी विधान भवन परिसरात दुपारी आले. विधानसभेच्या पायरीवर प्रसिद्धीमाध्यमांना सभागृहातील माहिती देण्याकरिता शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे आले होते. त्यांना पुष्पगुच्छ देण्याकरिता गिरीश व्यास पुढे सरसावले. परंतु विनोद तावडे यांनी त्यांना स्पष्ट शब्दात पुष्पगुच्छ घेणार नसल्याचे सांगितले. व्यास यांना त्यांनी उलट पुस्तक भेट देण्याचा पायंडा घालण्याचा सल्ला
दिला.