19 September 2020

News Flash

नागपुरात तुकाराम मुंढेच्या घराबाहेर समर्थकांची गर्दी, ‘We Want Munde Sir’ च्या घोषणा

नागपुरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली

नागपुरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाली असून आज ते मुंबईसाठी रवाना झाले. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने नागपूरकर त्यांच्या निवासस्थानी जमले होते. तुकाराम मुंढेंचं समर्थन करणाऱ्या नागपूरकरांकडून यावेळी ‘We Want Munde Sir’ तसंच ‘आगे आगे मुंडे पीछे पड गये गुंडे’ अशा घोषणा दिल्या. पोलिसांनी मुंढे समर्थकांना निघून जाण्यास सांगितले असता काही वेळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली

नागपूर महापालिका आयुक्तपदी असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर महापालिकेत बदली होण्याआधी तुकाराम मुंढे एड्स नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर होते. तत्कालीन फडणवीस सरकारने त्यांची एड्स नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर नियुक्ती केली होती. तुकाराम मुंढे यांच्या जागी राधाकृष्णन बी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Thank you Nagpur! म्हणणाऱ्या तुकाराम मुंढेंची फेसबुक पोस्ट व्हायरल
नागपूरकरांनी सात महिन्यांच्या कालखंडात जी साथ दिली आहे त्याबद्दल तुकाराम मुंढे यांनी नागपूरकरांचे धन्यवाद मानत फेसबुक पोस्ट लिहिली आहे.

Goodbye NMC, Thank you Nagpur!

नुकतंच कोविड विषाणूच्या संक्रमणातून मी मुक्त झालो. अनेकांनी मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि आलेल्या प्रत्येकाला भेटण्याचा मी प्रयत्न केला. माझ्या प्रति असलेल्या प्रत्येकाच्या भावनांचा मी आदर करतो. आपण दिलेल्या प्रेमाच्या ऋणात मी आयुष्यभर राहीन अशी ग्वाही यानिमित्ताने देतो.

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कर्तव्य बजावलेला सात महिन्यांचा काळ माझ्यासाठी खूप काही शिकविणारा ठरला. कोविड महामारीच्या निमित्ताने मनपा आयुक्त म्हणून जे अधिकार प्राप्त झाले, त्या अधिकारांचा उपयोग उत्तम पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी कठोर निर्णय घेतले. त्यावर टीका झाली. मात्र, प्रत्येक निर्णय हा जनतेच्या भल्यासाठी घेतला याचे समाधान नक्कीच आहे. या काळातील अनुभव आयुष्यभरासाठी शिदोरी म्हणून कामात येईल, यात शंका नाही.

जे-जे चांगले शिकायला मिळाले, ते शिकलो. काही कटू अनुभव असतीलही; मात्र त्यातूनही बोध घेतला. नव्या ठिकाणी रुजू होण्यासाठी उद्या मुंबईला रवाना होतोय. जेथे कुठे असेल, आपले प्रेम कायम सोबत असेल. या शहरासाठी काही चांगले करण्याचा प्रयत्न केला, याचा अभिमान असेल. नागपूर महानगरपालिकेतील कटू-गोड आठवणींसह मनपाला Good bye. आपण सर्वांनी जी साथ दिली त्याबद्दल Thank you…!

अलविदा…!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2020 9:10 am

Web Title: tukaram mundhe supporters gather outside his residence in nagpur sgy 87
Next Stories
1 Coronavirus : पुन्हा ५८ रुग्णांचा मृत्यू!
2 ६३ पैकी केवळ २८ करोना खासगी रुग्णालये कार्यान्वित
3 अबब..करोनाग्रस्ताचे पाच दिवसांचे देयक पाच लाख! 
Just Now!
X