20 September 2020

News Flash

तरुणाईला खुणावते ‘अ‍ॅनिमेशन’ क्षेत्र!

विदर्भातून अनेकांनी अ‍ॅनिमेशनच्या क्षेत्रात पुण्या-मुंबईला जावून नाव कमावले आहे.

वेगळे काही करू इच्छिणाऱ्यांना अनेक संधी

उदयोन्मुख क्षेत्र म्हणून ‘अ‍ॅनिमेशन’ उद्योगाकडे पाहिले जाते. महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये क्वचितच याविषयावर अभ्यासक्रम चालवले जात असतील पण, हे क्षेत्र आपल्यासाठी नवखे नाही. त्याला अनुसरून आणि रोजगाराच्या संधी हेरून यात व्यावसायिक अभ्यासक्रम नगण्य आहेत. म्हणून वैदर्भीय या क्षेत्रात नाहीत, असे अजिबातच नाही. नेहमीप्रमाणेच वैदर्भीय मुले धाव घेतात ती पुण्या-मुंबईकडे आणि तेथून थेट बंगलोर, दिल्ली किंवा परदेशीच जातात. सुमारे दहा वर्षांपूर्वी मानेवाडा भागातील विणकर कॉलनीतील रितेश डगवार या विद्यार्थ्यांने अ‍ॅनिमेशनच्या क्षेत्रात जाण्याचा मनोदय व्यक्त करीत पुणे गाठले. सध्या तो बंगलोरमधील एका नामांकित प्रॉडक्शन हाऊसमध्ये नोकरीला आहेत.

व्यंगचित्रकला हा विषय आपल्यासाठी नवीन नाही. घराघरात पोहोचलेला आणि अक्षरश: वेड लावणारा हा विषय आहे.त्यात चिमुकले अगदी हरकून जातात ‘बोंगो’, ‘अकबर आणि बिरबल’, ‘शक्तिमान अ‍ॅनिमेटेड’, ‘शिवा’, ‘लिटल कृष्णा’, ‘कुंभकर्ण’, ‘छोटा भीम’ आणि दहा-बारा वर्षांपूर्वी घराघरात पोहोचलेला ‘मोगली’ अ‍ॅनिमेशनमधून पुढे आलेला आहे. अ‍ॅनिमेशनचा स्वतंत्र वर्ग आहे आणि तो केवळ बालगोपालांचाच नाही तर आबालवृद्धही हौसेने पाहतात. अगदी अलीकडचे ‘डोरोमन’ फारच प्रसिद्ध आहे. तासन्तास मुले टीव्हीसमोरून उठत नाहीत.

विदर्भातून अनेकांनी अ‍ॅनिमेशनच्या क्षेत्रात पुण्या-मुंबईला जावून नाव कमावले आहे. त्यात प्रसिद्ध व्यंगचित्रकार अमरावतीचे विजय राऊत यांचे नाव अग्रक्रमाने घेता येईल. व्यंगचित्रकार म्हणून त्यांची ओळख असली तरी त्यांनी अनेक अ‍ॅनिमेटेड चित्रपटही केले आहेत आणि त्याची झलक यावर्षीच्या सुरुवातीला नागपुरात भरवण्यात आलेल्या राज्यस्तरीय व्यंगचित्र प्रदर्शनामध्ये दिसली. शुक्रवारी जागतिक व्यंगचित्रकार दिन आहे आणि नुकतेच दिल्लीतील भारतीय जनसंवाद संस्थेचे (आयआयएमसी) महासंचालक के.जी. सुरेश यांनी नॅशनल सेंटर फॉर एक्सलन्स इन अ‍ॅनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट, गेमिंग अ‍ॅण्ड कॉमिक्सवर (एनसीओई) अभ्यासक्रम सुरू करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे या क्षेत्रात जावून स्वतंत्ररित्या काही करू पाहणाऱ्यांसाठी मोठी सुवर्णसंधीच ठरणार आहे.

अ‍ॅनिमेशन किंवा व्हिज्युअल्सच्या संदर्भात पाहिजे तसे मार्गदर्शन मुलांना मिळत नाही. हा पायाभूत अभ्यासक्रम आहे. पण, रोजगार किंवा व्यवसायाच्या दृष्टीने त्याकडे पाहिले जात नाही. भविष्यात हे क्षेत्र झळाळून निघेल. पुण्या-मुंबईकडेच वैदर्भीयांचा ओघ दिसून येतो. आज ते बंगलोर, पुणे, मुंबईतील प्रॉडक्शन हाऊसेसमध्ये चांगल्या पदांवर नोकऱ्या करतात. हे क्षेत्राला अधिकाधिक बळ देण्याची गरज आहे.

राजीव गायकवाड, व्यंगचित्रकार 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2017 12:45 am

Web Title: youngsters attract to animation fields
Next Stories
1 सिमेंट रस्त्यांची ‘पोलखोल’
2 या सरंजामी प्रथांचा शेवट कधी?
3 रेल्वे तिकीट विक्रीसाठी बुकिंग सेवकांची नियुक्ती
Just Now!
X