नागपूर : इयत्ता ९ वी ते ११ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम फॉर व्हायब्रंट इंडिया (यशस्वी) सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी एक परीक्षा घेतली जाणार असून या परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी १.२५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्यासाठी देशभरातून १५ हजार विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे.
हेही वाचा – नागपुरात डिझेलअभावी ‘एसटी’च्या फेऱ्यांना कात्री!
हेही वाचा – गडचिरोलीमध्ये आदिवासी युवकांच्या आंदोलनाने भाजप नेते अस्वस्थ!
परीक्षेचे आयोजन नॅशनल टेस्टिंग एजन्सीला देण्यात आले आहे. योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रिया अद्याप सुरू असून, २९ सप्टेंबर ही परीक्षेची संभाव्य तारीख म्हणून ठेवण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या मागास, मागासवर्गीय आणि अनुसूचित जातीचे विद्यार्थी या शिष्यवृत्ती योजनेत सहभागी होऊ शकतात. आर्थिक मागास विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत व्हावी या उद्देशाने ही शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. या योजनेत १५ हजार विद्यार्थी निवडले जाणार असल्याने अनेकांना याचा लाभ होणार आहे.