भंडारा : रोवणीच्या कामासाठी एकोडी किन्ही गावावरून लाखनीकडे महिला मजुरांना घेऊन जाणारे वाहन उलटले. यात २१ महिला मजूर जखमी तर एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मासलमेटा लाखोरी वळणावर घडली.
जखमी झालेल्या महिला मजुरांना लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.तेथून गंभीर जखमीना भंडारा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. वळणावर एका बालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
कीन्ही/ एकोडी वरून शहापूर जवाहरनगर येथे रोवणे करायला २१ मजुरांना घेऊनवाहन जात होते. अपघातात ८ महिला गंभीर जखमी झाल्या असून याना भंडारा येथे सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. इतर पाच महिला ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे उपचार घेत आहे. ग्रामीण रुग्णालय लाखनी येथील मजुरांची प्रकृती गंभीर असल्याने भंडारा येथे पाठविण्यात आले. त्यात भंडारा येथे नेत असताना सायत्रा नेवारे (५०) किनी, हिचा मृत्यू झाला.
भंडारा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आलेल्या गंभीर जखमी मजुरांचे नावे छत्रपती बोरकर (४०), जोत्सना सोनवाणे (३६), वंदना सोनावणे(३४), .प्रमिला शेंडे (४०), रत्नमाला बोरकर(३५), वैशाली सोनवाणे(३७), रामकला नेवारे (३०), प्रमिला गेडाम (४२) असे आहेत. निष्काळजीपणें व हायगयीने वाहन चालविणाऱ्या चालकांवर लाखनी पोलीस स्टेशन येथेगुन्हा दाखल करण्यात आला.