scorecardresearch

Premium

‘ऑपरेशन मुस्‍कान’मुळे १० मुले सुरक्षित घरट्यात

नोव्‍हेंबर महिन्‍यात राबविण्‍यात आलेल्‍या ‘ऑपरेशन मुस्‍कान’ अंतर्गत ९ मुली आणि १ मुलगा अशा दहा अल्‍पवयीन मुलांचा शोध घेत या मुलांना पालकांच्या ताब्यात देण्‍यात आले आहे.

10 children safe due to Operation Muskan
अमरावती पोलीस आयुक्‍तालयाच्‍या हद्दीत 'ऑपरेशन मुस्‍कान-१२' ही मोहीम राबविण्‍यात आली.(फोटो- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्‍ता टीम

अमरावती : पोलीस आयुक्‍तालयाच्‍या हद्दीत नोव्‍हेंबर महिन्‍यात राबविण्‍यात आलेल्‍या ‘ऑपरेशन मुस्‍कान’ अंतर्गत ९ मुली आणि १ मुलगा अशा दहा अल्‍पवयीन मुलांचा शोध घेत या मुलांना पालकांच्या ताब्यात देण्‍यात आले आहे. विशेष म्हणजे शोधलेल्या मुलांमध्ये पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद नाही अशीही काही मुले, मुली आहेत.

Sales of houses in Pune
पुण्यात घरांची विक्री जोरात! जाणून घ्या कोणत्या घरांना पुणेकरांची मिळतेय पसंती
removing brain tumor Nair hospital
मुंबई : मेंदूतील गाठ काढून मुलाला जीवदान, नायर रुग्णालायत तब्बल सहा तास शस्त्रक्रिया
Fraud of 90 lakh by giving lure of good returns on investment
मुंबई : गुंतवणुकीवर चांगला नफा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक
Prisoner asked for leave
वडिलांच्या मृत्यूमुळे कैद्याने मागितली ७ दिवसांची सुट्टी, मिळाली १ दिवस, उच्च न्यायालय म्हणाले…

पोलीस आयुक्‍त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्‍त सागर पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक रिता उईके यांच्‍या नेतृत्‍वात १ ते ३० नोव्‍हेंबरपर्यंत अमरावती पोलीस आयुक्‍तालयाच्‍या हद्दीत ‘ऑपरेशन मुस्‍कान-१२’ ही मोहीम राबविण्‍यात आली. या मोहिमेअंतर्गत पोलीस ठाण्‍यात कोणतीही नोंद नाही, अशा ५ मुलांचा शोध घेण्‍यात आला. बालकांना बाल कल्‍याण समितीशी समन्‍वय साधून सुखरूप त्‍यांच्‍या पालकांच्‍या स्‍वाधीन करण्‍यात आले आहे.

आणखी वाचा-‘अमरावती-पुणे-अमरावती’ एसटीसाठी ठरले लाभदायी; १८२ फेऱ्यांमधून ३८ लाखांचे उत्‍पन्न

हरवलेल्या मुलांची त्यांच्या पालकांशी भेट घडवून देण्याचे काम पोलिसांसाठी आव्हानात्मक असते. मुला-मुलींना पळवून त्यांना भीक मागण्यापासून ते अगदी देहविक्रयाच्या व्यवसायात ढकलले जाते. ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत शून्य ते १८ वयोगटातील हरवलेल्या मुलांचा शोध घेण्‍यात येतो.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 10 children safe due to operation muskan mma 73 mrj

First published on: 02-12-2023 at 11:34 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×