यवतमाळ : आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा येथून परत येत असलेल्या आर्णी येथील सराफा व्यावसायिकाला तीन चोरट्यांनी अंतरगाव फाट्याजवळ अडवले. चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील रोख रकमेसह १० लाखांचा मुद्देमाल लुटण्यात आला. या घटनेने आर्णी परिसरात खळबळ उडाली.

लखन मोहनलाल जयस्वाल, रा. आर्णी असे सराफा व्यापाऱ्याचे नाव आहे. ते सावळी सदोबा येथून आर्णीकडे येत होते. अंतरगाव फाट्याजवळ त्यांना तीन अज्ञात चोरट्यांनी अडवले. यावेळी चाकूचा धाक दाखवत, २० कॅरेट सोन्याचे दागिने वजन अंदाजे ३५ तोळे, चांदीचे मोड २२ तोळे, नगदी १ लाख ८ हजार , रुपये व सॅमसंग कंपनीचा मोबाईल किंमत १५००० रुपये असा एकूण १० लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.या प्रकरणाची माहिती मिळताच आर्णी पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले ठाणेदार केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात दोन वेगवेगळी पथके तयार करून, दिग्रस पॉईंट व कोळवण फाटा येथे नाकेबंदी करण्यात आली. अंतरगाव शिवार भानसरा जंगल, कुन्हा जंगल, तसेच डोळंबवाडी परिसरात अज्ञात आरोपींचा शोध घेण्यात आला. दरम्यान दुचाकीवर तीन इसम दिग्रसकडे गेल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता, आरोपी सापडले नाही.

हेही वाचा >>>गुन्हेगारांच्या टोळ्या संपवून शहर अंमली पदार्थमुक्त करणार! गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांचा संकल्प

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही वेळाने मौजा नाथनगर शिवारात गुन्ह्यात वापरलेले विना नंबरचे वाहन असल्याची माहिती आर्णी पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता तेथे एक काळ्या रंगाची अॅक्टिव्हा व चोरीस गेलेली सोन्याच्या दागिने असलेली रिकामी बॅग सापडली.या प्रकरणी आर्णी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आर्णी पोलीस करित आहे. दरम्यान,एसडीपीओंनी घटनास्थळाची पाहणी करून लवकर तपासाचे निर्देश दिले.