शेजारी राहणाऱ्या ४० वर्षीय विवाहित व्यक्तीने घरात शिरून अकरावर्षीय मुलीचे तोंड दाबून बलात्कार केला. ही घटना गुरुवारी भरदुपारीबुटीबारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. सचिन कुकडे असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली.

हेही वाचा >>> तरुणींच्या छेडछाडीच्या सर्वाधिक घटना मुंबईत, महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावरील आकडेवारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीडित ११ वर्षीय मुलगी नेहा (काल्पनिक नाव) ही सहाव्या वर्गातशिकते. तिचे आईवडिल शेतात मोलमजुरी करतात. त्यांच्या घराशेजारी आरोपी सचिन कुकडे हा राहतो. गुरुवारी दुपारी बारा वाजता सचिन नेहाच्या घरीआला. त्यावेळी नेहा झोपली होती. त्याने नेहाशी अश्लील चाळे केले. तिनेआरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिचे तोंड दाबून सचिननेतिच्यावर बलात्कार केला.तिच्या आईवडिलांनी बुटीबोरी पोलीस ठाण्याततक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड यांनी तपास सुरु केला आहे.