नागपूर : देशात २०२३ मध्ये ज्या ७ लाख ७१ हजार ४१८ जणांनी जीवनयात्रा संपवली. यापैकी ३१. ९ प्रकरणांत कौटुंबिक कारण होते. व्यसनांमुळे ७, प्रेमभंगातून ४.७, नैराश्यातून १.४ आणि बेरोजगारीतून १.८ आणि आजारपणातून १९ टक्के तरुणांनी आत्महत्येचा मार्ग निवडला. अंमली पदार्थ व्यसनांतून २०२३मध्ये मुंबईत १५६ तर नागपुरात १०५ तरुणांनी आत्महत्या केल्याची नोंद एनसीआरबीने घेतली आहे.

आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेताना ६१ टक्के म्हणजे जवळपास १लाख जणांनी आपल्याच गळय़ाभोवती फास लावून जीवन संपवले. तर २५.४ टक्के म्हणजे ४२ हजार ७८७ जणांनी विषारी द्रव्यांचा घोट घेतलाय. तर ४.१ टक्के म्हणजे ७०७५ जणांनी पाण्यात बुडून जीव दिला.

देशातल्या एकूण आत्महत्येपैकी एकटय़ा महाराष्ट्रात २२ हजार ६८७ जणांनी आत्मघाताचा मार्ग निवडला. महाराष्ट्रातील या आत्महत्यांपैकी ३१५० जणांनी अंमलीपदार्थ, मद्यासारख्या व्यसनांमधून जीवन संपवले. मुंबईत १५६ आणि नागपुरात २०२३मध्ये १०५ तरुणांनी अमलीपदार्थ, मद्याच्या सेवनातून आत्महत्या केल्याची नोंद एनसीआरबीने घेतली आहे. आत्महत्येत देशाच्या सरासरीत महाराष्ट्राचा वाटा १३.२ टक्के आहे. राज्यातील एकूण लोकसंख्येशी त्याची सरासरी काढली तर महाराष्ट्रात दर लाख लोकसंख्येपैकी १७ जणांनी जीवनयात्रा संपवली, असे एनसीआरबीचे आकडे दर्शवतात.

अमली पदार्थ सेवनाचे सरासरी ७ टक्के बळी 

* अमली पदार्थ, मद्यासारख्या व्यसनांमुळे देशात २०२३मध्ये ११, ६३४ (७.१) जणांनी आत्महत्या केली. यात मुलींची संख्या २८० पर्यंत गेली आहे. परीक्षांमधील अपयशानंतर २०९५ विद्यार्थ्यांनी जीवन संपवले.

* बेरोजगारीतून ३१७० (१.८), व्यावसायिक अपयशातून २०८३ (१.१), प्रदिर्घ आजारातून ३१,४८४ (१९ टक्के) जणांनी जीवन संपवले. आत्महत्याग्रस्त पुरुषांची टक्केवारी ६८ तर महिलांची टक्केवारी ६३ टक्के आहे. ’ शहरी भागातल्या तरुणांच्या ५७.९ टक्के आत्मघातांपैकी अमली पदार्थाच्या सेवनातून गेलेले बळी हे ७ टक्के आढळले.