नागपूर : बारावीचे शिक्षण पूर्ण करून आयटी कंपनीत आंतरवासिता(इंटर्नशिप) करण्याची व कायम नोकरीची संधी महाराष्ट्र समग्र शिक्षा कार्यक्रमाद्वारे एचसीएल कंपनीसोबत झालेल्या सामंजस्य करारामुळे मिळाली आहे. जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि एचसीएल टेक कंपनीने शिक्षक दिनाच्या औचित्याने ‘प्रिंसिपल मिट’ कार्यक्रमाचे आयोजन केले.

या कार्यक्रमात उपस्थित जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक शिक्षण) रवींद्र काटोलकर आणि एचसीलएलचे सहायक महाव्यवस्थापक साजेश कुमार यांच्यासह नागपूर शहरातील उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकांसमोर विद्यार्थ्यांनी अनुभव कथन केले. असा आहे ‘अर्ली करीअर प्रोग्राम’ माहिती व तंत्रज्ञान (आयटी)  क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या ‘एचसीएल टेक’ कंपनीशी महाराष्ट्र समग्र शिक्षा मार्फत सामंजस्य करार करण्यात आला आहे. याअंतर्गत राज्य शासनातर्फे ‘महाराष्ट्र यंग लीडर ॲस्पिरेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम’ राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत २०  हजार विद्यार्थ्यांना सशुल्क प्रशिक्षण देण्यात येते.

हेही वाचा >>> महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेतील गुणांच्या सीमारेषेची ‘स्‍पर्धा’ चर्चेत; कारण काय, वाचा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बारावी गणित विषय असणाऱ्या इच्छुक व २०२४ मध्ये परीक्षा देणाऱ्या  विद्यार्थ्यांना ,प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ६ महिने सशुल्क प्रशिक्षण व ६ महिने  प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळणार आहे. या ६ महिन्यांच्या आंतरवासिता कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना १० हजार रुपये प्रशिक्षण भत्ता मिळत आहे. तर एका वर्षाचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना आयटी प्रोफेशनल म्हणून कायम नोकरी, तसेच पगार व सोबतच उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे बिटस् पिलानी, शास्त्रा, ॲमिटी, आयआयएम-नागपूर व केएल अशा नामवंत विद्यापीठांमधून उच्च शिक्षण पूर्ण करण्याची संधीही मिळत आहे. उच्च शिक्षण घेण्यासाठी लागणारा खर्च काही प्रमाणात एचसीएल कंपनी स्कॉलरशीप स्वरूपात देत आहे.