नागपूर : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व‎ प्रशिक्षण संस्थेकडून (महाज्योती) राज्यातील ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गेल्या चार वर्षांपासून दर्जेदार प्रशिक्षण तसेच विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देण्याचे मोलाचे कार्य करीत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली असून यात महाज्योतीच्या १५१ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. तर विनीत विक्रांत शिर्के यांची उपजिल्हाधिकारी पदाकरिता निवड झाली असून इतर मागास वर्गातून प्रथम आला आहे.

महाज्योतीकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षा पूर्व प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. महाज्योतीच्या १५१ विद्यार्थ्यांमध्ये ९८ इतर मागास वर्ग, ४९ विमुक्त जाती-जमाती तसेच ४ विशेष मागास प्रवर्गीय प्रशिक्षणार्थ्यांचा समावेश आहे. त्यापैकी विनीत विक्रांत शिर्के यांची उपजिल्हाधिकारी या पदाकरिता निवड झालेली आहे. तसेच ओबीसी प्रर्वगात राज्यात मुलीमध्ये अव्वल क्रमांक वैष्णवी हरिभाऊ बावस्कार यांनी पटकावला.

Entrance Exam JEE Mains Exam for Engineering Architecture career news
प्रवेशाची पायरी: इंजिनीअरिंग, आर्किटेक्चरसाठी जेईई मेन्स परीक्षा
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
Maharashtra ssc 10th board exam
दहावीच्या परीक्षा अर्जांसाठी मुदतवाढ… कधीपर्यंत भरता येणार अर्ज?
NMC, safety doctors, medical colleges, doctors,
धक्कादायक! नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या पोटातून डॉक्टरांनी काढल्या तब्बल ६५ वस्तू; शस्त्रक्रियेदरम्यान झाला मृत्यू, पोटात आढळलं…
Kishanganj Bihar
Kishanganj : बिहारच्या किशनगंजमध्ये गूढ आजाराने ३ मुलांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक, गावात पसरलं घबराटीचं वातावरण
Boy dies after falling into water tank in park navi Mumbai
नवी मुंबई: आठ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू; उद्यानातील पाण्याच्या टाकीत पडला
police registered case against restaurant waiter for giving impure water
डोंबिवली पलावातील हॉलमधील सेवकावर अशुध्द पाणी पिण्यास दिले म्हणून गुन्हा
National Commission for Medical Sciences is aggressive about MBBS admission
एमबीबीएस प्रवेशाबाबत राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग आक्रमक

हेही वाचा – अमरावती जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के

विद्यार्थांना उत्तम प्रशिक्षण दिल्यामुळेच ओबीसी विद्यार्थी इतक्या मोठ्या संख्येने उत्तीर्ण झाले. स्पर्धा परीक्षा ही केवळ ज्ञानाची परीक्षा नसून यात अभ्यासात घेतलेली मेहनत, जिद्द, आणि चिकाटी असते. शिस्तीतून मिळालेले फळ म्हणजेच विद्यार्थ्यांचे यश असते. – राजेश खवले, व्यवस्थापकीय संचालक.

महाज्योतीमार्फत देण्यात येणाऱ्या उत्तम दर्जाच्या प्रशिक्षणाची ही फलश्रूती आहे. दिवसेंदिवस महाज्योतीचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवत आहेत. त्यामुळेच विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. – अतुल सावे, मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण.

हेही वाचा – नागपूर: नवीन ‘फॅड’! तोंडातून धूर सोडणारी बिस्किटे…

आर्थिक परिस्थितीशी झगडून यश

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीशी संघर्ष करून वैष्णवी यांनी हे यश मिळवल्याचे त्यांचे मार्गदर्शक विशाल नागपुरे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. २०१९ ला त्यांच्या वडिलांचे छत्र हरवले. आई एका खासगी रुग्णालयात कामाला होती. वैष्णवी यांची उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाल्याने त्यांच्या कठोर परिश्रमाचे चीज झाले आहे.

महाज्योतीच्या प्रशिक्षणामुळे मदत : विनीत शिक्रे

महाज्योतीच्या योजनेचा विद्यावेतन व प्रशिक्षणाच्या माध्यमातून खूप फायदा झाला. आर्थिक भार कमी होऊन मी चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकलो. तसेच माझ्या यशाचे श्रेय माझ्या पालकांनी वेळोवेळी दिलेला पाठिंबा व महाज्योतीने राबवलेले परीक्षा पूर्व प्रशिक्षण व अर्थसहाय्य यांना देतो, असे विनीत शिर्के यांनी सांगितले.