नागपूर : नवरा-बायकोचं नातं काही वेगळेच असते, कधी प्रेमाचा बहार फुटतो तर कधी वादाचे फटाके. नागपूरमध्येही असेच काहीसे घडले. मागील तीन महिन्यांत नागपूर महापालिकेच्या समुपदेशन केंद्रात नवरा-बायको भांडणाची १५३ प्रकरणे आली. मात्र त्यानंतर ‘तुझ माझं जमेना, पण तुझ्या वाचून करमेना’ म्हणत ६९ जोडपी पुन्हा गुण्यागोविंदाने नांदायला लागली.
हेही वाचा – नागपूर : फुटाळाच्या संगीत कारंज्याचे काय होणार? ‘या’ तारखेला निर्णय
हेही वाचा – भरती! सार्वजनिक बांधकाम विभागात दोन हजारांवर जागा, मात्र पात्रता…
नागपूर शहरात महापालिकेच्या समाजविकास विभागाने झोननिहाय समुपदेशन केंद्राची स्थापना केली आहे. नवरा-बायकोमधील कौटुंबिक वाद विकोपाला जाऊ नये आणि त्याचे रुपांतर घटस्फोटात होऊ नये यासाठी हे केंद्र कार्य करतात. जून ते ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान या केंद्रावर १५३ प्रकरणे दाखल करण्यात आली. या सर्व प्रकरणांमध्ये महापालिकेच्यावतीने नवरा-बायकोचे समुपदेशन केले गेले. समुपदेशानंतर ६९ जोडपी पुन्हा सुखाने नांदायला तयार झाली. एकूण प्रकरणांपैकी ६४ प्रकरणांवर पाठपुरावा सुरू आहे, तर २० प्रकरणे न्यायालयात पाठविण्यात आली आहेत.