चंद्रपूर : गेल्या चार वर्षांपासून शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशाचे शासनाकडे १८०० कोटी रुपये थकीत आहे. ही रक्कम तातडीने देण्यात यावी, या मागणीसाठी आम आदमी पार्टीने जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे आणि योगेश गोखरे यांच्या नेतृत्वात जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

एकीकडे राजकीय नेते मंडळीच्या मुलांचे शिक्षण पंचतारांकित शाळात, परदेशात सुरू आहे. परंतु सरकार गरीब, वंचित घटकातील मुलांचे शिक्षण व्हावे यासाठी निधी नाही, असे सांगत हात वर करीत आहे, अशी टीका जिल्हाध्यक्ष मुसळे यांनी केली. महाराष्ट्रातील खासगी शाळांमध्ये वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पालकांची एक लाख मुले दरवर्षी शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेश घेतात.

हेही वाचा – नोकरी सोडून उभारला कृषी अवजारांचा उद्योग, अकोल्यातील दोन अभियंता तरुणांच्या ‘स्टार्टअप’ला राष्ट्रीय पुरस्कार

आता २२-२३ शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून शासनाकडून गेल्या चार वर्षांतील सुमारे अठराशे कोटी रुपये एवढी रक्कम शाळांना मिळालेली नाही. यामुळे शाळा अडचणीत आल्या आहेत. ही थकबाकी आठ दिवसांत शाळांना अदा करावी, अन्यथा आपकडून राज्यभरात आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

हेही वाचा – गडचिरोली: पदवी प्रवेशाचे स्वप्न भंगले! अपघातात मामा-भाचीचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निदर्शनात संतोष दोरखंडे, भिवराज सोनी, मयूर राईकवार, दीपक बेरशेट्टीवार, सुनीताताई पाटील, राजूभाऊ कुडे, रहमान पठाण, देवेंद्र अहेर, सुधीर पाटील, संतोष बोपचे, जास्मिन शेख, तब्बसूम शेख, सुनील चौधरी, लक्ष्मण पाटील, नौरतम शाहू, प्रदीप वाळके, रवी पपुलवार, नागेश्वर गंडलेवार, कविता टिपले, कल्पना सोनटक्के यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.