नागपूर विभागीय आयुक्तपदी विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या डॉ. माधवी खोडे-चवरे यांची जागा घेतील. चवरे सध्या प्रशिक्षणासाठी मसुरीला गेल्या आहेत. या पदावर नियुक्त होणाऱ्या विजयालक्ष्मी या तिसऱ्या महिला अधिकारी आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विजयालक्ष्मी भारतीय प्रशासकीय सेवेच्या २००१च्या तुकडीच्या अधिकारी आहेत. २००१ मध्ये त्यांनी आयएएस परीक्षेत देशात पहिला क्रमांक पटकावला होता. कर्नाटकचे धाडसी पोलीस अधिकारी शंकर बिदारी यांच्या त्या कन्या आहेत. त्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर होत्या. तेथून त्यांची नागपूरला विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.

विजयालक्ष्मी यांनी हिंगोली येथे उपायुक्त, सिंधुदुर्ग येथे जि.प.च्या मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी, राज्य महिला आयोग्याच्या सदस्य सचिव, महिला विकास महामंडळाच्या प्रबंध संचालक, माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या संचालक व कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तपदावर काम केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2001 ias topper female officer nagpur divisional commissioner msr
First published on: 06-08-2022 at 09:39 IST