scorecardresearch

फेसबुक मित्राचा तरुणीवर बलात्कार

दोघांनी एकमेकांची मोबाईल क्रमांक घेतले आणि त्यांच्यात मैत्री झाली. त्याने तरुणीवर लैंगिक अत्याचार केला

फेसबुक मित्राचा तरुणीवर बलात्कार
प्रतिनिधिक छायाचित्र

नागपूर : रेल्वेत अधिकारी असलेल्या युवकाने फेसबुकवरून ओळख झालेल्या तरुणीवर बलात्कार केला. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून कपिलनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आशीष गोपीचंद बागडे (२६, वायगाव-रामटेक) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशीष बागडे हा रेल्वे राजस्थान राज्यात कार्यरत आहे.

ऑक्टोबर २०२१ मध्ये त्याची फेसबुकवरून २५ वर्षीय तरुणीशी ओळख झाली. त्याने तिचा मोबाईल क्रमांक घेऊन तिच्याशी चॅटिंग केली. दोघांची मैत्री झाली. दोन ते तीन महिने ते फेसबुकवरून बोलत होते. ती तरुणी एका अगरबत्ती बनवणाऱ्या कंपनीत नोकरीवर आहे. दोघांनी एकमेकांची मोबाईल क्रमांक घेतले आणि त्यांच्यात मैत्री झाली. त्याने तरुणीवर लैंगिक अत्याचार केला आणि मोबाईलमध्ये तिचे अश्लील छायाचित्र काढले. त्यानंतर तो छायाचित्र दाखवून वारंवार अत्याचार करीत होता.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.