गडचिरोली: सिरोंचा तालुक्यातील चिटूर येथून शासकीय योजनांची जत्रा कार्यक्रमावरून ट्रॅक्टरने परत येत असताना झालेल्या अपघातात तीन महिला ठार, तर ३० जण जखमी झाल्याची घटना रंगधामपेठा चेक गावाजवळ घडली.

शासनाने विविध योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासकीय योजनांची जत्रा कार्यक्रम चिटुर येथे आयोजीत केला. या कार्यक्रमात विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी लक्ष्मीदेवपेठा येथील ३० जण ट्रॅक्टरमध्ये बसून चीटूरला गेले होते. कार्यक्रम आटोपून परत येत असताना बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास रंगधामपेठा चक गावाजवळ ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उलटले. यात ट्रॅक्टरमध्ये बसलेले तीन वृद्ध महिला ठार तर ३० जण जखमी झाले. त्यांना तत्काळ अंकिसा प्राथमिक रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

हेही वाचा… अकोला : प्रस्थापितांपुढे नवख्यांचे आव्हान, सहकार क्षेत्रातील हालचालींना वेग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यातील १५ ते १६ जणांना सिरोंचा येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. यातील जखमींची नावे कळली नसून हे सर्व जण लक्ष्मीदेवपेठा येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. सोयीच्या गावी हा कार्यक्रम घेणे शक्य असताना जिथे जाण्यासाठी रस्ता नाही अशा ठिकाणी कार्यक्रम घेण्याचा अट्टाहास कशासाठी, असा प्रश्न नागरिक विचारत आहे.