मानव-वन्यजीव संघर्षांचा मोठा धोका

नागपूर : भारतातील एकू ण वाघांच्या संख्येपैकी सुमारे ३५ टक्के  वाघ हे संरक्षिता क्षेत्राबाहेर आहेत. मानव-वन्यजीव संघर्ष हा वन्यप्राण्यांसाठी मोठा धोका असून या संघर्षांचा परिणाम जगातील ७५ टक्के  जंगली मांजरीच्या(कॅ ट फॅ मिली) प्रजातीवर झाला आहे.

डब्ल्यूडब्ल्यूएफ आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्र म (युएनइपी) यांनी २७ देशांमधील ४० संघटनांमधील १५५ तज्ज्ञांच्या सहकार्याने हा अभ्यास के ला आहे. या अभ्यासावर आधारित ‘सर्वासाठी भविष्य – मानव-वन्यजीव सहवास आवश्यक’ या अहवालात भारतातील ३५ टक्के  वाघ, ४० टक्के  अफ्रि कन सिंह, ७० टक्के  अफ्रि कन आणि आशियाई हत्ती संरक्षित क्षेत्राच्या बाहेर आहेत, असे नमूद के ले आहे. मनुष्य आणि प्राणी जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा संघर्ष उद्भवतो आणि स्वतचे संरक्षण करण्यासाठी किं वा सुडबुद्धीने प्राण्यांची शिकार के ली जाते. त्यामुळे या प्रजातीची संख्या कमीकमी होत आहे. सागरी आणि स्थलीय संरक्षित क्षेत्रे जगातील के वळ ९.६७ टक्के  भाग व्यापतात. यापैकी बहुतेक संरक्षित क्षेत्रे एकमेकांपासून वेगळी झाली आहेत. त्यामुळेच अनेक प्रजाती त्यांच्या अस्तित्त्वासाठी मानवी अधिवास असणाऱ्या क्षेत्रावर अवलंबून असतात. संरक्षित क्षेत्राबाहेर जिथे माणूस आणि वन्यप्राणी दोघांचेही अस्तित्व आहे, अशा ठिकाणी मांसभक्षी व तृणभक्षी प्राणी महत्त्वाची भूमिका बजावतात. मानव-वन्यजीव संघर्षांमुळे अनेक स्थलीय आणि सागरी मांसाहरी प्रजाती प्रभावित होत आहेत. विकासाच्या दबावामुळे भारतात मानव-वन्यजीव संघर्षांचे आव्हान वाढत आहे. जगातील दुसऱ्या क्र मांकाची लोकसंख्या भारताची आहे आणि वाघ, आशियाई हत्ती, एकशिंगी गेंडा, आशियाई सिंह, आणि जागतिक पातळीवर धोक्यात असलेल्या प्रजाती यामुळे भारताला मानव-वन्यजीव संघर्षांला सामोरे जावे लागत आहे. अशावेळी सामाजिक संवर्धन साध्य करण्यासाठी लक्ष दिले पाहिजे, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

mumbai high court on sawantwadi dodamarg wildlife corridor
विश्लेषण : सावंतवाडी-दोडामार्ग कॉरिडॉर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील? न्यायालयाचा आदेश काय? होणार काय?  
survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
Tungareshwar Protected Forest is in danger
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण

वन्यजीवांची संख्या ६८ टक्क्यांनी घसरली

१९७० पासून जागतिक वन्यजीवांची संख्या सरासरी ६८ टक्क्यांनी घसरली आहे. एके काळी मोठय़ा प्रमाणात असलेल्या या प्रजाती मानव-वन्यजीव संघर्षांमुळे कमी होत आहेत.  नैसर्गिकरित्या कमी असलेल्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यावर तातडीने पर्याय शोधला नाही तर या प्रजाती नामशेष होण्याचा धोका आहे आणि असे झाल्यास त्याचा परिणाम पर्यावरण प्रणाली व जैवविविधतेवर होण्याची शक्यता आहे. -मार्गारेट किन्नार्ड, जागतिक वन्यजीव तज्ज्ञ, डब्ल्यूडब्ल्यूएफ.

पर्याय शोधल्यास सहजीवन शक्य

मानव-वन्यजीव संघर्ष वाढत असल्याचे आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे या अहवालात ठळकपणे नमूद  करण्यात आले आहे. मानव-वन्यजीव संघर्षांचे मूलभूत कारण ओळखून त्याकडे लक्ष दिल्यास व योग्य तो पर्याय शोधल्यास  मानव-वन्यजीव सहजीवन शक्य आहे. -सुसॅन गार्डनर, संचालक निसर्गयंत्रणा विभाग, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम.