scorecardresearch

३६ बँकांमधील ३५४ कोटींच्या फसवणुकीत ३८० कर्मचारी सहभागी! माहितीच्या अधिकारात २०२२ मधील वास्तव उघड

सर्वाधिक प्रकरणे ‘आयसीआयसीआय’ आणि ॲक्सिस बँकेतील असून या घटनांमुळे बँकांच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

bank fraud
बँकांमधील फसवणुकीत कर्मचारी सहभागी!

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : देशातील ३६ बँकांमध्ये २०२२ या वर्षभरात ३५४.७६ कोटींच्या फसवणूकीत ३८० कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे माहितीच्या अधिकारातून पुढे आले आहे. सर्वाधिक प्रकरणे ‘आयसीआयसीआय’ आणि ॲक्सिस बँकेतील असून या घटनांमुळे बँकांच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

नागरिक विविध बँकांमध्ये खाते उघडून वेगवेगळ्या ठेवी ठेवून गुंतवणूक करतात. १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान वर्षभरात देशातील राष्ट्रीय, खासगी, सहकारी व इतर सगळ्याच प्रकारच्या ३६ बँकांमध्ये घडलेल्या ३५४.७६ कोटींच्या फसवणुकीत ३२० कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने माहितीच्या अधिकारात सामाजिक कार्यकर्ते अभय कोलाकर यांना दिलेल्या माहितीतून पुढे आले.

हेही वाचा >>> अश्लील छायाचित्र काढून विवाहित प्रियकाराचा प्रेयसीवर बलात्कार

सर्वाधिक ५५ कर्मचाऱ्यांचा सहभाग आयसीआयसीआय बँकेतील २३.७१ कोटींची फसवणुकीत पुढे आला आहे. ॲक्सिस बँकेतील ८०.५९ कोटींच्या फसवणुकीत ५२ कर्मचारी, फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडमधील २.६४ कोटींच्या फसवणुकीत २८ कर्मचारी, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडमधील ९८ लाखांचा फसवणुकीत २४ कर्मचारी, पंजाब नॅशनल बँकेतील १९.६३ कोटींच्या फसवणुकीत २० कर्मचारी, इंडियन ओव्हरसिज बँकेतील २७.०९ कोटींच्या फसवणुकीत १८ कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचेही कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारात पुढे आणले.

बँकेचे नाव व फसवणुकीत सहभागी कर्मचाऱ्यांची संख्या

(१ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यानची स्थिती)

बँकेचे नाव                                     फसवणूक कर्मचारी सहभाग

………………………………………………………………………………………

आयसीआयसीआय बँक                                  २३.७१ कोटी ५५

ॲक्सिस बँक                                     ८०.५९ कोटी ५२

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक लि.                        ०२.६४ कोटी २८

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लि.                            ००.९८ कोटी २४

पंजाब नॅशनल बँक                                     १९.६३ कोटी २०

इंडियन ओव्हरसिज बँक                                २७.०९ कोटी १८

बँक ऑफ बडोदा                                              १८.५६ कोटी १८

कॅनरा बँक                                        १४.२३ कोटी १६

इंडियन बँक                                       ०३.१८ कोटी १२

कोटक महिंद्रा बँक लि.                                         ०२.२७ कोटी १४

तामिळनाड मर्कंटाइल बँक लि. १६.४४ कोटी १७

युनियन बँक ऑफ इंडिया                           १५.६८ कोटी १२

उत्कर्ष स्मॉल फायनांस बँक लि.                  ३०.९० कोटी ०२

भारतीय स्टेट बँक                          ३३.४९ कोटी ०७

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 09:52 IST

संबंधित बातम्या