अकोला : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीचा निधी जिल्ह्यांना वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. अकोला जिल्ह्यात ७८.३५ लाखांचा मदत निधी ५९५ शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे.

हेही वाचा – वर्धा : शिक्षकच नाही तर शाळा उघडता कशाला? गावकऱ्यांचा सवाल अन ठोकले कुलूप

हेही वाचा – अंबादास दानवे म्हणतात, महानिर्मितीने काम दिलेल्या कोल वाॅशरिजच्या अर्थकारणात सत्ता पक्षातील नेत्यांचा वाटा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मार्च, एप्रिल व मे महिन्यामध्ये पडलेल्या अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतातील पिकांचे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास दोन हेक्टर मर्यादेत निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते. त्यानुसार अकोला जिल्ह्यात मार्च-एप्रिल या कालावधीतील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या क्षेत्रासाठी मदत निधी देण्यात येणार आहे. त्यानुसार जिह्यात ४३०.१२ हेक्टर बाधित क्षेत्र असलेल्या जिल्ह्यातील ५९५ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकूण ७८.३५ लाखांची मदत वितरित केली जाणार आहे. या मदतीमुळे अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.