वर्धा: सेलू तालुक्यातील केळझर येथील बुद्ध विहार परिसरात शेतात काम करणाऱ्यांना पाषाण मूर्ती सापडली. पुरातत्व विभागाच्या सांगण्यानुसार ही मूर्ती १३ व्या शतकातील यादवकालीन वृषभनाथ महाराजांची आहे. शेतात काम करीत असताना एक अखंड दगड दिसून आला. त्यावरील माती बाजूला करताच एक कोरीव मूर्ती दिसून आली.

ही माहिती पसरताच गावकऱ्यांनी तसेच पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली. त्यानंतर नागपूर पुरातत्व विभागाचे अधीक्षक अरुण मलिक तसेच तज्ञ श्याम बोरकर, शरद गोस्वामी व अन्य चमू आली. मूर्ती अवजड असल्याने जेसीबी आणून मूर्ती काढावी लागली. पाच फूट लांब, ४४ सेंटिमीटर रुंद व दीड फूट जाडीची मूर्ती साडे तीन तासाच्या परिश्रमानंतर बाहेर निघाली.

हेही वाचा… आणाभाका एकीशी अन लग्न दुसरीशी…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही मूर्ती नागपूरला पुरातत्व विभागात नेण्याची तयारी सुरू झाली. मात्र त्यास कडाडून विरोध सुरू झाला. शेवटी मूर्ती विहारातच ठेवण्याचा निर्णय झाला. यापूर्वी याच ठिकाणी भगवान चंद्रा स्वामी, महावीर स्वामीची मूर्ती आढळून आली होती. केलझर परिसरात पुरातन मुर्त्या आढळून आल्या आहेत. हे गाव महाभारतकालीन चक्र नगर असल्याचे सांगितले जाते.