यवतमाळ: प्रभू श्री राम यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून अडचणीत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पुसद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. भाजप युवा मोर्चाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष निलेश पेन्शनवार यांनी आव्हाड यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

जितेंद्र आव्हाड यांनी ३ जानेवारीला भाषणात प्रभू श्रीरामाबद्दल आक्षेपार्ह विधान केले. या वक्तव्यावरून भावना भडकविण्याचा प्रयत्न आव्हाड यांनी केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

हेही वाचा… वडिलांनी तीन वर्षांच्या मुलास तेलंगणात विकले; आर्णी येथे आंतरराज्यीय मानवी तस्करी उघडकीस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या तक्रारीवरून पुसद शहर पोलिसांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास भादंवीचें कलम २९५ अ ( भावना दुखावणे) अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.