scorecardresearch

नागपूर: कुख्यात गुंड आंबेकरच्या भाच्यावर गुन्हा दाखल

कुख्यात गुंड संतोष आंबेकरचा भाचा शैलेष केदार याने एका तक्रारदाराला चाकू दाखवून ठार मारण्याची धमकी दिली.

crime 22
सैन्यातील मुलांच्या वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली डॉक्टरची फसवणूक (प्रतिनिधिक छायाचित्र/लोकसत्ता )

कुख्यात गुंड संतोष आंबेकरचा भाचा शैलेष केदार याने एका तक्रारदाराला चाकू दाखवून ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी शैलेषसह चौघांवर गुन्हे दाखल केले.आंबेकर याची शहरात मोठी दहशत होती. त्याने अनेक व्यापाऱ्यांकडून खंडणी वसूल केली होती. तसेच अनेक फ्लॅट किंवा भूखंडावर बळजबरी ताबा मिळवला होता. सध्या आंबेकर हा कारागृहात आहे. आंबेकरच्या एका गुन्ह्यात तक्रारदार अमित अण्णाजी मोझरकर (३८, इतवारी, संतीरोड) हे साक्षिदार आहेत. २०१५ मध्ये अमितने आपला भूखंड संतोष आंबेकरला विकला होता.

हेही वाचा >>>पोलिसांची पदोन्नती रखडल्याने राज्यभर ‘खदखद’! विनंती बदली होत नसल्याने अधिकारी नाराज

त्या जागेवर आंबेकरने मोठी इमारत बांधली. त्यामध्ये आंबेकरने अमित याच्या आईच्या नावावर एक फ्लॅट दिला. तेथे अमित कुटुंबियांसह राहतो. मात्र, त्या फ्लॅटवर आंबेकरचा भाचा शैलेष केदार याला ताबा मिळवायचा आहे. त्यामुळे तो वारंवार अमित मोझरकर आणि त्यांच्या कुटुंबियांना ठार मारण्याच्या धमक्या देतो. २ फेब्रुवारीला शैलेष चार साथिदारांसह अमितच्या घरासमोर आला. त्याने अमितला चाकू दाखवून ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी अमितच्या तक्रारीवरून शैलेष व त्याच्या साथिदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 11:00 IST