वर्धा: उद्या घटस्थापना, होणार देवीचा जागर. वर्धा शहरात सार्वजनिक दुर्गोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दरवर्षी त्यात भरच पडत असते. रोषणाई, आरास, देखावे पाहण्यासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या भक्त मंडळींची एकच झुंबड उडते. या भाविकांसाठी अनेक मंडळे लंगरची सोय करतात.

रोज विविध प्रकारचा नाश्ता लंगर मधून दिला जातो. मात्र या पश्चात ठिकठिकाणी खूप कचरा साचतो. त्याची घाण पसरते. पर्यावरणास हा प्लास्टिक ताट वाटीचा कचरा घातक ठरत असल्याचे पाहून येथील गुंज या महिलांच्या सेवाभावी व पर्यावरण प्रेमी संस्थेने आवाहन केले आहे. लंगरचा प्रसाद घेण्यासाठी घरूनच स्टीलची प्लेट किंवा वाटे आणावे.

हेही वाचा… वर्धा: निटच्या तयारीसाठी गरजू विद्यार्थ्यांना मिळणार निवास, भोजन व्यवस्थेसह शिष्यवृत्ती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्लॅस्टिकचा उपयोग टाळावा. ज्या मंडळात हे कसोशीने पाळले जाईल त्यास रोख पुरस्कार गुंज तर्फे देण्यात येणार आहे. नागरिक स्टीलचा वापर करीत असल्याचा व्हिडिओ पाठवायचा आहे. हर्षा टावरी ( ९१४५५०४६८१ ) यांच्याशी संपर्क साधावा.