scorecardresearch

Premium

भंडारा : भरधाव चारचाकीने तिघांना चिरडले, सैन्य अधिकाऱ्यासह तीनजणांचा मृत्यू

भरधाव वेगाने आलेल्या टोयाटो ग्लांझा या चारचाकी वाहनाने दोन दुचाकींना एकाच वेळी जबर धडक दिली. या भीषण अपघातात तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

four wheeler hit two wheelers Khurshipar
भंडारा : भरधाव चारचाकीने तिघांना चिरडले, सैन्य अधिकाऱ्यासह तीनजणांचा मृत्यू (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

भंडारा : भरधाव वेगाने आलेल्या टोयाटो ग्लांझा या चारचाकी वाहनाने दोन दुचाकींना एकाच वेळी जबर धडक दिली. या भीषण अपघातात तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना भंडाराजवळील खुर्शिपार येथे रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.

हेही वाचा – पंतप्रधान कुसुम योजना : अडीच हजार शेतकऱ्यांचे अर्ज रखडले, कारण काय? वाचा…

ex intel director avtar saini dies in cycle accident
‘इंटेल’च्या माजी अधिकाऱ्याचा सायकल अपघातात मृत्यू ; नवी मुंबईतील पामबिच मार्गावरील दुर्घटना
accident on Ramjhula in Nagpur woman driver crushed two people
नागपुरातील रामझुल्यावर भीषण अपघात, महिला कारचालकाने दोन युवकांना चिरडले
loksatta satire article on ashok chavan name in adarsh scam join bjp
उलटा चष्मा : अपघातानंतरचा ‘आ’!
Three died in accident
चंद्रपूर : लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने तिघांना चिरडले, अपघातानंतर चालक पसार

हेही वाचा – भंडारा : वैनगंगा कोपली, इशारा पातळी ओलांडणार….

एका सैन्य अधिकाऱ्याचा मृतांमध्ये समावेश आहे. नागेश्वर बालपांडे, वय ३४, रा. सातोना, हरगोविंद क्षीरसागर, वय ४५ रा. पाहुणी, विनोद भोंदे, वय ४७ रा. मोहदुरा यांचा अपघात मृत्यू झाला. नागेश्वर बालपांडे हे बेलगाम येथे सैन्यदलात कार्यरत असून ते सुट्टीवर गावाकडे आले होते. या अपघातात चारचाकी वाहनातील दोघे गंभीर असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A four wheeler hit two two wheelers the incident took place at khurshipar near bhandara ksn 82 ssb

First published on: 16-09-2023 at 09:22 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×